मुंबई : महाराष्ट्राचे मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसानिमित्त त्यांच्यावर शुभेच्छांचा वर्षाव केला जातोय. कार्यकर्ते आणि नेते त्यांना विविध प्रकारच्या भेटवस्तू देतायेत. मात्र अमरावतीच्या खासदार नवनीत राणा यांनी मुख्यमंत्र्यांना काहीशी वेगळी भेट दिली आहे.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या वाढदिवसांचं औचित्य साधत नवनीत राणा यांनी आपल्या खासदारकीचा पहिला पगार मुख्यमंत्री सहाय्यता निधीला देण्याचा निर्णय घेतला आहे. त्यांनी आज मुख्यमंत्र्यांची ‘वर्षा’ बंगल्यावर भेट घेऊन त्यांना वाढदिवसाच्या शुभेच्छा दिल्या. आणि मदतीचा धनादेश मुख्यमंत्र्यांना दिला. यावेळी त्यांच्यासोबत त्यांचे पती रवी राणादेखील उपस्थित होते.
महाराष्ट्रातील शेतकरी दुष्काळाच्या झळा सोसत आहे. पावसाने म्हणावी तशी आणखी हजेरी लावलेली नाही. शेतकऱ्यांवर दुबार पेरणीच्या संकटाची टांगती तलवार आहे. अशा परिस्थितीत आपला पगार त्यांनी दुष्काळग्रस्त शेतकऱ्यांच्या मदतीसाठी दिला आहे.
खासदार नवनीत राणा संवेदनशील आणि सामाजिक भान बाळगणाऱ्या म्हणून ओळखल्या जातात. त्यांच्या याच कृत्याने आज पुन्हा त्यांचा संवेदनशीलपणा अधोरेकित झाला आहे.
दरम्यान, मागील आठवड्यात महाराष्ट्रात शेतकऱ्यांच्या होत असलेल्या आत्महत्यांवर संसदेत त्यांनी जोरदार आवाज उठवला होता.
महत्वाच्या बातम्या-
-काँग्रेस म्हणजे जातीयता, घराणेशाही आणि भ्रष्टाचार- चंद्रकांत पाटील
पुढचा मुख्यमंत्री कोण हे मला काय विचारता?- राज ठाकरे
अजित पवारांच्या वाढदिवशी बारामतीत ‘मुर्दाबाद’च्या घोषणा! पाहा व्हीडिओ-
-उद्धव ठाकरेंना मुख्यमंत्रीच काय पण पंतप्रधान झालेलं पाहायचंय- तानाजी सावंत
-पाकिस्तानला निघून जावं; ‘हा’ अभिनेता आझम खानवर भडकला