हिंगणघाट प्रकरणातल्या पीडितेला लवकरात लवकर न्याय द्या; खा. नवनीत राणा आक्रमक

वर्धा | वर्ध्यातल्या हिंगणघाट येथे एकतर्फी प्रेमातून प्राध्यापिकेला जिवंत जाळण्याचा धक्कादायक प्रकार सोमवारी घडला. या घटनेने संपूर्ण महाराष्ट्रात संतापाची लाट आहे. ही तरूणी मृत्यूशी झुंज देतीये. या घटनेचे पडसाद मंगळवारी लोकसभेत उमटलेले पाहायला मिळाले. खासदार नवनीत राणा कौर यांनी हा मुद्दा लोकसभेत मांडत घटनेबद्दल संताप व्यक्त केला.

महिलांवरचा अत्याचार किती काळ सहन करायचा. हे अत्याचार बंद करायचे असतील तर अतिशय कडक कायदा केला पाहिजे, असं मत खासदार नवनीत राणा यांनी लोकसभेत मांडलं.

महिलांवरच्या अत्याचाराच्या प्रकरणांवर तातडीने न्याय होत नाही. फक्त ‘तारीख पे तारीख’ असं सुरु असतं, असं त्यांनी यावेळी नमूद केलं. हिंगणघाट येथील पीडितेची बाजू आक्रमकपणे मांडत राणा यांनी महिलांच्या सुरक्षेचा मुद्दा लावून धरला. तर अशा प्रकरणांमध्ये लवकरात लवकर न्याय देण्याची भूमिका घ्यावी, असंही राणा म्हणाल्या.

दरम्यान, हिंगणघाट जळीत प्रकरणातील पीडित मुलीचा खर्च मुख्यमंत्री सहाय्यता निधीतून केला जाणार आहे, अशी घोषणा गृहमंत्री अनिल देशमुख यांनी केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची प्रतिमा खराब केली आहे; भाजपची टीका

-मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी राज्याची प्रतिमा खराब केली आहे; भाजपची टीका

-एक दिवस ओवैसी देखील हनुमान चालिसा म्हणताना दिसतील- योगी आदित्यनाथ

-उद्धवजी, काय तो निर्णय घेऊनच टाका… मी तुमच्या सोबत आहे; नितेश राणेंचं ट्वीट

-आमचा आवाज दाबणं इतकं सोप का आहे?; झायरा वसीमचा मोदींना सवाल