देश

मला तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती- नुसरत जहाँ

नवी दिल्ली : खासदार नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांनी ‘आप की अदालत’ या कार्यक्रमात हजेरी लावली होती. या कार्यक्रमात दोघींनी मनमोकळेपणाने उत्तरं दिली. यात पतीने विचारलेल्या प्रश्नावर नुसरत जहाँ अवाक झाल्या.

‘कुटुंब’ किंवा तू जगतेस ती ‘लाईफस्टाईल’ यापैकी एखादी गोष्ट निवडायची असेल तर तू काय निवडशील?, असा प्रश्न नुसरत जहाँ यांच्या पतीने विचारला. त्यावर ‘तुमच्याकडून या प्रश्नाची अपेक्षा नव्हती,’ असं नुसरत जहाँ म्हणल्या.

माझ्यासाठी कुटुंब हे प्राधान्य असेल. या कुटुंबाचा विस्तार होत आहे. हा परिवार खुप मोठा होत आहे. आणि मला या सर्व गोष्टींमध्ये संतुलन राखायचे आहे. यामध्ये तुम्हालाही मदत करावी लागेल, असं कमालीचं उत्तर नुसरत जहाँ यांनी यावेळी दिलं.

‘आप की अदालत’ या कार्यक्रमात नुसरत जहाँ आणि मिमी चक्रवर्ती यांनी सोशल मीडियावर ट्रोलिंगबाबत आपली मतं व्यक्त केली. टिकटॉक व्हिडीओ तरुणाईलाही खूप आवडतो आणि जर आम्ही एखादा व्हिडीओ केला तर त्यात गैर काय, असं नुसरत म्हणाल्या.

दरम्यान, संसदेबाहेर फोटो काढून आम्ही कोणताच नियम मोडला नाही, असं मिमी चक्रवर्ती यांनी यावेळी सांगितलं.

महत्वाच्या बातम्या-

-…म्हणून मराठा क्रांती ठोक मोर्चाचे 25 टक्के उमेदवार निवडणुकीच्या रिंगणात!

-“ट्रम्प खोटं बोलले; काश्मीर प्रश्नी मोदींनी मदत मागितलीच नाही”

-आधी कमलनाथांनी आणि आता रेड्डींनी फॉलो केला ‘राज ठाकरे पॅटर्न’!; स्थानिकांना 75 टक्के नोकऱ्या

-‘ती’ म्हणते; आदित्य ठाकरे येतील आणि आमचा प्रश्न लगोलग सुटेल… असं आम्हाला वाटलं नव्हतं!

-हिमा दासने केलेल्या सुवर्ण कामगिरीबद्दल रिषभ पंत म्हणतो…

IMPIMP