“मला भाजपात घ्या… म्हणत रामराजे रोज मंत्र्यांचे उंबरे चढतायेत”

सोलापूर | राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर हे भाजपमध्ये येण्यासाठी रोज मंत्र्यांचे उंबरठे झिजवत आहेत, असा गौप्यस्फोट करत भाजपचे खासदार रणजितसिंह नाईक निंबाळकर यांनी रामराजेंची खिल्ली उडवली आहे.

राष्ट्रवादीचे नेते रामराजे निंबाळकर हे भाजपमध्ये येण्यासाठी रोज मंत्र्यांचे उंबरठे झिजवत असल्याचं मी ऐकलं आहे. मी नीरा देवभर धरणाचे पाणी वळवण्याचा निर्णय घेतला. त्यानंतर शरद पवारांचंही काही चालत नाही हे अनेकांच्या लक्षात आल्यानं अनेकजण भाजपमध्ये येत आहेत, असंही रणजितसिंह नाईक निंबाळकर म्हणाले आहेत.

लोकसभा निवडणकीवेळीसुद्धा आणि निकालानंतर देखील रामराजे आणि रणजितसिंह यांच्यात शाब्दिक वाकयुद्ध रंगलं होतं. अत्यंत खालच्या पातळीवर जाऊन दोघांनीही एकमेकांवर शाब्दिक चिखलफेक केली होती.

दरम्यान, गेल्या महिनाभरापासून रामराजे भाजपच्या वाटेवर असल्याच्या चर्चा आहेत. मात्र यासंबंधी त्यांच्याकडून कुठलंही अधिकृत म्हणणं कळू शकलं नाही.

महत्वाच्या बातम्या-