‘नुसता जयजयकार करून चालणार नाही’; संभाजीराजेंनी शिवभक्तांना केली ‘ही’ कळकळीची विनंती

मुंबई | 19 फेब्रुवारी’ अर्थात (Chhatrapati Shivaji Maharaj) छत्रपती शिवाजी महाराज यांचा जन्मोत्सव. फेब्रुवारी महिना उजाडताच शिवभक्तांना या उत्सवाचे वेध लागतात. महाराष्ट्राचे आराध्यदैवत असलेल्या छत्रपतींचा हा उत्सव केवळ राज्यापूरताच मर्यादीत राहिलेला नाही तर परराज्यात जगभरात पसरला आहे. महाराजांच्या जन्माचा उस्ताह प्रत्येक मराठी माणसाच्या चेहऱ्यावर दिसून येत आहे.

भोसले घराण्याचे वंशज आणि खासदार संभाजीराजे भोसले यांनी शिवजयंतीच्या पूर्वसंध्येला शिवाजी महाराजांच्या नावानं सर्व शिवभक्तांना शुभेच्छा देतानाच कळकळीचं आवाहन केलं आहे.

शिवाजी महाराज हे सर्वंसाठी आदर्श आहेत. असा जगात कुठलाच राजा झाला नाही की 300 वर्षांनंतरही प्रेरणा शिवभक्त घेऊन जातात. माझी शिवभक्तांना विनंती एकच राहील. नुसता जयजयकार करून चालणार नाही. पण शिवाजी महाराजांचा आचार-विचार, त्यांचं आत्मचिंतन करून आपल्या दैनंदिन जीवनात आपण कसे पुढे जाऊ शकतो, या दृष्टीकोनातून बघावं असं माझं सगळ्या युवकांना आवाहन आहे, असं संभाजीराजे भोसले म्हणाले आहेत.

दरम्यान, आज किल्ले शिवनेरी गडावर छत्रपती शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव साजरा होतोय रात्रीपासुन राज्यभरातुन शिवभक्त शिवज्योत घेऊन शिवनेरी गडावर दाखल होऊन सलामी देत आहे.

मागील दोन वर्षापासुन किल्ले शिवनेरीवर मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थित शिवजन्मोत्सव साजरा करण्यात आला मात्र यंदा कोरोना नियमांना शितीलता मिळाल्यानंतर शिवजन्मोत्सव मोठ्या उत्साहात साजरा होत आहे.

छत्रपती शिवाजी महाराज यांचे जन्मस्थळ शिवनेरी येथे कोरोनामुळे मर्यादित शिवभक्तांच्या उपस्थितीमध्येच हा सोहळा पार पडणार आहे. शिवजयंती साजरी करण्याच्या अनुशंगाने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी गृहविभागाच्या प्रस्तावाला मंजूरी दिली असली तरी नियम-अटींचे पालन करावं लागणार आहे.

महत्वाच्या बातम्या- 

छत्रपती शिवाजी महाराजांच्या सर्वात उंच पुतळ्याचं औरंगाबादेत आदित्य ठाकरेंच्या हस्ते अनावरण! 

“शेंबड्या मुलासारखं लढायचं आणि मैदानात हरायचं, सोमय्या असो किंवा फडणवीस…” 

Gold Silver Rate: सोनं पुन्हा 50 हजाराच्या पार, चांदीचे दर देखील गगनाला भिडले

…तर मुंबई महापालिका पाडू शकते नारायण राणेंचं घर; वाचा काय सांगतो नियम

“सासू बनून त्रास द्याल तर सुनेचेही दिवस येतील”