मुंबई : पश्चिम महाराष्ट्रातील कोल्हापूर आणि सांगलीमधील पूरग्रस्तांच्या मदतीवरुन खासदार संभाजीराजे भोसले यांनी उच्च आणि तंत्र शिक्षणमंत्री विनोद तावडे यांच्यावर निशाणा साधला आहे. विनोद तावडेंनी काही दिवसांपूर्वी मुंबईतील रस्त्यावर उतरुन पूरग्रस्तांसाठी मदत मागितली. त्यावरुन संभाजीराजे चांगलेच संतापल्याचं पाहायला मिळालं. संभाजीराजेंनी फेसबुकवर विनोद तावडेंचा व्हीडिओ शेअर करत त्यांच्यावर निशणा साधला आहे.
स्वाभिमानी कोल्हापूरकरांना कोणाच्या भिकेची गरज नाही. महाराष्ट्राच्या मंत्र्याला भीक मागण्याची वेळ यावी? ह्यापेक्षा दुर्दैव ते काय? मी हा व्हिडीओ आत्ताच पाहिला, इथं भीक स्वीकारली जाणार नाही, अशा शब्दात संभाजीराजेंनी विनोद तावडेंना सुनावलं आहे.
पुरग्रस्तांची क्रूर चेष्टा सहन केली जाणार नाही. सर्वसामान्य महाराष्ट्रवासीयांचे प्रेम, कोल्हापूर, सांगलीकरांनी मनापासून स्वीकारलं आहे, असंही संभाजीराजेंनी आपल्या फेसबुक पोस्टमध्ये म्हटलं आहे.
पश्चिम महाराष्ट्रातील पूरामध्ये सर्वस्व गमावलेल्या नागरीकांसाठी राज्यभरातून मदतीचा ओघ सुरु आहे. 11 ऑगस्ट रोजी भाजपने बोरीवलीत मदत फेरीचे आयोजन केलं. त्यावेळी विनोद तावडे आणि खासदार गोपाळ शेट्टी यांनी रस्त्यावर उतरुन मदतीचे आवाहन केलं.
दरम्यान, विनोद तावडेंच्या या मदत करण्याची पद्धत संभाजीराजेंना आवडली नसल्याचं दिसत नाही. त्यामुळे फेसबुक पोस्ट आणि ट्वीट करत त्यांनी तावडेंवर निशाणा साधला. यावर विनोद तावडेंनी आणखी कोणतीही प्रतिक्रिया दिलेली नाही.
महत्वाच्या बातम्या-
-“महाराष्ट्र काँग्रेस-राष्ट्रवादी मुक्त करण्याची भाषा करणारं भाजप स्वतःच राष्ट्रवादी’युक्त’ झालंय”
-मनसेची आज बैठक; ईडीविरोधात आंदोलनाच्या तयारीत!
-“…त्यांना 10 दिवसांपूर्वीच सांगितलं होतं, राज ठाकरेंना वाचवा”
-मुख्यमंत्रिपदाचा गैरवापर केल्याचा फडणवीसांवर आरोप; कठोर कारवाईची मागणी