नवी दिल्ली : जम्मू आणि काश्मीरमध्ये लागू असलेल्या 370 कलम रद्द करण्याचा मोठा निर्णय मोदी सरकारने घेतला आहे. छत्रपती शिवाजी महाराजांचे वंशज खासदार संभाजीराजे छत्रपती यांनी मोदी सरकारने घेतलेल्या निर्णयाचे स्वागत केले आहे.
देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवाजी महाराजांनाही आवडला असता. आज प्रत्येक भारतीयाचं स्वप्न पूर्ण झालं आहे. खऱ्या अर्थाने काश्मीर भारताचे अविभाज्य अंग बनले, असं संभाजीराजे म्हणाले आहेत. त्यांनी यासंदर्भात फेसबूक पोस्ट केली आहे.
काश्मीर आजपासून केंद्रशासित प्रदेश होणार! या ऐतिहासीक क्षणाचा साक्षीदार मलाही होता आलं, याचा मला आनंद आहे, असंही संभाजीराजे म्हणाले आहे.
काश्मीर जनतेला मुख्य प्रवाहाला आणणाऱ्या आपण सर्वजण उभे राहिले पाहिजे, असं म्हणत त्यांनी मोदी सरकारच्या निर्णयाला पाठिंबा देण्याचं आवाहन केलं आहे.
येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एकत्र येणं आवश्यक आहे. मी पंतप्रधान नरेंद्र मोदी, गृहमंत्री अमित शहांचं आणि सरकारचे अभिनंदन करतो, असं संभाजी राजेंनी ट्वीटही केलं आहे.
देशाला एकत्र करणारा आजचा निर्णय छत्रपती शिवरायांना सुद्धा आवडला असणार!!! #Article370 #KashmirHamaraHai
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 5, 2019
प्रत्येक भारतीयांचे स्वप्न आज पूर्ण झाले! खऱ्या अर्थाने काश्मीर भारताचे अविभाज्य अंग बनले. या ऐतिहासिक क्षणांचा साक्षीदार मला ही होता आलं, हे मी माझं भाग्य समजतो.#Article370
— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 5, 2019
काश्मिरी जनतेला मुख्यप्रवाहात आणणऱ्या निर्णयासोबत आपण सर्वजण उभे राहिले पाहिजे. येणाऱ्या पिढ्यांच्या उज्ज्वल भविष्यासाठी सर्वांनी एक होणं आवश्यक आहे.
मी नरेंद्र मोदी, अमित शाह आणि सरकारचे अभिनंदन करतो!!! @narendramodi @AmitShah #Article370 #JammuKashmir— Sambhaji Chhatrapati (@YuvrajSambhaji) August 5, 2019
महत्वाच्या बातम्या-
-“आज बाळासाहेब ठाकरे असते तर त्यांना आनंद झाला असता”
-सौ सौ सलाम आपको…!; परेश रावलांनी केलं मोदींचं कौतुक
-मोदी सरकारचा मास्टरस्ट्रोक; जम्मू-काश्मीरसंदर्भात ‘हा’ मोठा निर्णय
-जम्मू काश्मीरसंदर्भात मोदी सरकारचे 3 मोठे निर्णय
“मुख्यमंत्री महोदय, जनतेची कामं केल्याचा दावा करता तरी तुमच्यावर ही वेळ का येते?”