फडणवीसांच्या शाहू महाराजांवरील त्या वादग्रस्त ट्विटवर; छत्रपती संभाजीराजेंची प्रतिक्रिया

कोल्हापूर | बुधावारी छत्रपती शाहू राजांचा स्मृतीदिन असल्याने विविध क्षेत्रातली मंडळी आणि शाहूप्रेमी राजांना अभिवादन करत होते. विविध राजकारण्यांनी सोशल मीडियाच्या माध्यमातून शाहू राजांना अभिवादन करणाऱ्या पोस्ट केल्या. विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांच्याकडून मात्र शाहूराजांना अभिवादन करताना चूक झाली. त्यांनी शाहूराजांना सामाजिक कार्यकर्ते असं विशेषण वापरलं. काही तासांत या प्रकरणाने पेट घेतला. त्यानंतर फडणवीसांनी ते ट्विट डिलीट केलं. या सगळ्या प्रकरणावर आता खासदार संभाजीराजे व्यक्त झाले आहेत.

छत्रपती घराण्याची प्रतिष्ठा जपण्यासाठी मी काय केलं पाहिजे, हे मला कुणीही शिकवण्याची गरज नाही, असं म्हणत छत्रपतींविषयी जेंव्हा केव्हा एखादं प्रकरण समोर आलं, तेंव्हा सर्वात आधी मी भूमिका घेतली आहे. प्रत्येक वेळी मी पुढे असतो, यापुढेही असेन. शिवरायांची तुलना नरेंद्र मोदींसोबत जेंव्हा केली गेली तेंव्हा देशात सर्वात आधी मी बोललो होतो. सिंदखेड राजा मधील माझ्या चालू भाषणात जेंव्हा मला हे कळलं तेंव्हा तात्काळ या घटनेचा जाहीर निषेध मी केला होता. केंद्रीय मंत्री रवी शंकर प्रसाद यांनी महाराजांचा एकेरी उल्लेख केला तेंव्हा मी त्यांना माफी मागायला भाग पाडलं होतं. मग इतरांचं काय घेऊन बसलाय?, असं ते म्हणाले आहेत.

काल माझ्या घरगुती कार्यक्रमा मध्ये व्यस्त असल्याने, समाज माध्यमांमध्ये घडत असलेली चर्चाही मला माहिती नव्हती. त्याआधी दिवसभरात माझ्या सहकाऱ्यांना राजर्षी शाहू महाराजांच्या स्मृती दिनाची तसेच आमच्या चिरंजीवांच्या वाढदिवसाची पोस्ट करायला सांगितली होती. संध्याकाळी जेंव्हा मी फोन चालू केला तेंव्हा एका पत्रकाराचा फोन आला होता. त्यांना मी प्रतिक्रिया सुद्धा दिली. तोपर्यंत ते वादग्रस्त ट्विट डिलिट केलं गेलं होतं, असं त्यांनी सांगितलं.

महाराष्ट्रात सारथी संस्थेच्या स्वायत्ततेसाठी आंदोलन उभं केलं. ते राजर्षी शाहू महाराजांचे जिवंत स्मारक आहे. त्याला जिवंत ठेवण्यासाठी मी रस्त्यावर उतरलो होतो. राजर्षी शाहू महाराजांनी, बहुजन समाजाला एकत्र आणण्यासाठी जे जे केलं, त्या गोष्टींमधून आदर्श घेऊन मी कार्य करत असतो. मराठा आरक्षणाच्या लढयात मी त्याच उद्देशाने उतरलो होतो. आजही आहे. कोल्हापुरातील महापुरात स्वतःचा जीव धोक्यात घालून लोकांना वाचवण्यासाठी प्रयत्न केले. अश्या अनेक गोष्टी आहेत ज्या करत असताना मी स्वतःचा विचार करत नाही. कारण, त्यावेळी माझ्यासाठी देशहित, समाजहित महत्वाचे असते. सांगायचा मुद्दा एवढाच आहे की, प्रत्यक्ष कृतीतून काम करून दाखवण्याचा माझा स्वभाव आहे. शिवरायांपासून , राजर्षींपर्यंत माझ्या सर्व पूर्वजांनी हीच शिकवण दिली आहे, असं ते म्हणालेत.

महत्वाच्या बातम्या-

-…तर तुम्ही दारूच्या बाटल्या घरपोच पुरवण्याची सेवा सुरू करावी; राऊतांचा ‘राज’समर्थकांवर निशाणा

-मी आज जो काही आहे तो बाळासाहेब ठाकरे यांच्यामुळेच- नारायण राणे

-नोकरभरती रद्द करू नका, वर्षभर किमान वेतनावर सेवेत घ्या- रोहित पवार

-‘…तर आर्मी बोलवावी लागेल’; किशोरी पेडणेकरांचा इशारा

-हायकोर्टाची महाराष्ट्र सरकारला मदत; मुख्यमंत्री सहाय्यता निधीत अडीच कोटी जमा