“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला”

नाशिक | 2014 साली महाराष्ट्रात भाजप (BJP) आणि शिवसेना सत्तेवर आली. त्यानंतर शिवसेना (Shivsena) आणि भाजपमधील संबंध दुरावत गेली. मुंबई महापालिकेत हा वाद प्रकर्षाने समोर आला होता. अशातच संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी भाजपवर टीका केली आहे.

मागील मुंबई महापालिकेची निवडणूक (Election) भाजप आणि शिवसेनेने वेगळी लढवली. त्यानंतर त्यांनी पुन्हा एकत्र येत मुंबई महापालिकेवर सत्ता प्रस्थापित केली होती.

2019 मध्ये विधानसभा निवडणुकीनंतर शिवसेना आणि भाजप वेगळी झाली आणि राज्यात मोठ्या नाट्यमय घडामोडीनंतर महाविकास आघाडीचं सरकार स्थापन झालं.

याच पार्श्वभूमीवर भाजप नेते आणि शिवसेनेचे नेते एकमेकांना नेहमी टोले लगावताना दिसत असतात. अशातच संजय राऊत यांनी पुन्हा एकदा भाजपवर टीका केली आहे.

सध्या शिवसेना नेते संजय राऊत नाशिकच्या दौऱ्यावर आहेत. त्यावेळी त्यांनी कार्यकर्त्यांशी संवाद साधताना भाजपवर टीका केली आहे. आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, दोन वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

दोन वर्षापुर्वी आम्ही महाराष्ट्र स्वातंत्र्य करून भगवा फडकवला आहे. शेतकऱ्यांना मालक नव्हे तर गुलाम करण्याचा तो कायदा होता. शेतकऱ्यांची जमीन बळकवण्याचा तो कायदा होता, असं संजय राऊत म्हणाले आहेत.

गाड्या घाल्या, गुंड पाठवले तरीही शेतकरी मागे हटले नाही. गेल्या दीड वर्षापासून शेतकरी दबावात होता, आता तो त्या जोखडातून बाहेर निघेल, असंही संजय राऊत म्हणाले आहेत.

पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी घेतलेल्या निर्णयाचं भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी दु:ख व्यक्त केलं होतं. त्यांना जर दु:ख वाटत असेल तर आपण शोकसभा घेऊ आणि शोक व्यक्त करू असंही पाटील म्हणाले आहेत.

1947 साली जनता रस्त्यावर आली होती. चले जावचं आंदोलन त्यावेळी झालं होतं. आता जनता रस्त्यावर आली असती तर पंतप्रधान कोण आणि गृहमंत्री कोण हे जनतेने पाहिलं नसतं, अशी खोचक टीका देखील त्यांनी यावेळी केली आहे

दरम्यान, संजय राऊत यांच्या या टीकेला आता भाजप काय प्रत्युत्तर देणार हे पहावं लागणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा

समीर वानखेडेंची बाजू भक्कम, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा दाखला 

‘…आता हे सहन होत नाही’; अमृता फडणवीसांचं नवं गाणं सोशल मीडियावर ट्रोल 

“कृषी कायदे मागे घेतल्यानंतर चंद्रकांत पाटलांना शोक असेल तर शोकसभा घेऊ” 

भारताला ‘विश्वगुरु’ बनवण्यासाठी मोहन भागवतांनी दिलं ‘हे’ मंत्र