मुंबई | पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी वादग्रस्त कृषी कायदे मागे घेण्याची मोठी घोषणा केली. पंतप्रधान मोदींच्या या घोषणानंतर संपूर्ण राजकीय वर्तुळातून अनेक प्रतिक्रिया उमटल्या.
मोदींच्या या निर्णयानंतर भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील (MLA Chandrakant Patil) यांनी शेतकऱ्यांच्या आयुष्यात सूख आणि समृद्धी आणणारे तीन कृषी कायदे मागे घेण्याचा निर्णय पंतप्रधान नरेंद्र मोदी यांनी नाईलाजाने आणि दुःखाने घेतला. पण त्यामुळे शेतकऱ्यांचं खूप नुकसान होणार आहे, असं म्हटलं आहे.
चंद्रकांत पाटलांच्या प्रतिक्रियेनंतर संजय राऊत (MP Sanjay Raut) यांनी चंद्रकांत पाटलांना टोला लगावला. माझ्या शोक संदेश चंद्रकांत पाटील यांना पाठवेल. त्यांच्यासाठी हा शोक असेल तर त्यासाठी आपण शोकसभा घेऊ, असं म्हणत संजय राऊतांनी चंद्रकांत पाटलांवर निशाणा साधला.
देश उत्सव साजरा करत असेल तेव्हा जर कुणाला शोक वाटत असेल तर त्यांची मानसिकता तपासावी लागेल, अशा शब्दात संजय राऊत यांनी चंद्रकांत पाटील यांना टोलाही लगावला. आता संजय राऊतांच्या टीकेला आता चंद्रकांत पाटलांनी प्रत्युत्तर दिलं आहे.
संजय राऊत निम्मे डॉक्टर आहेत. मी त्यांच्याकडेच आता जातो. अलीकडे ते आणि नवाब मलिक काहीही बोलतात. त्यांनी माझी मानसिकता तपासावी आणि मी त्यांचं डोकं तपासतो. त्यांची स्मृती कमी आहे, अशी बोचरी टीका चंद्रकांत पाटलांनी राऊतांवर केली आहे.
मी कंगना रनौत यांचा प्रवक्ता नाही. संजय राऊत दिवसभरात 10 वेळेस बोलतील मला तेवढा वेळ नाही, असा टोलाही राऊतांनी लगावला आहे.
काँग्रेसनं एक कायदा तीन वेळा आणला आणि तो तिन्ही वेळेस रद्द करावा लागला, असं प्रत्युत्तर चंद्रकांत पाटील यांनी संजय राऊतांना दिलं आहे.
कृषी कायदे हे शेतकऱ्यांच्या हिताचे असूनही ते मला समजावून सांगता आलं नाही. यामुळे मोदींनी दु:ख व्यक्त केलं. विरोधकांनी जे होईल त्याच्या विरोधात बोलायचं असतं, असं चंद्रकांत पाटील म्हणाले.
दरम्यान, देवेंद्र फडणवीस यांनी अनिल परब यांना एखाद्या विद्यार्थ्याला समजावून सांगावं तसं कागद पेन घेऊन समजावून सांगितलं की संप कसा संपवता येईल, असंही चंद्रकांत पाटलांनी सांगितलं.
महत्त्वाच्या बातम्या-
मद्यप्रेमींसाठी आनंदाची बातमी! ठाकरे सरकारने घेतला ‘हा’ मोठा निर्णय
खट्टी मीठी यारी! तीन पक्षातील तीन दिग्गज नेत्यांचा एकाच सोफ्यावर बसून हास्यकल्लोळ
“आम्ही करेक्ट कार्यक्रम केला, 2 वर्षापूर्वी महाराष्ट्र स्वातंत्र्य झाला”
घोटाळ्यांवरुन गदारोळ सुरु असताना आणखी एका 100 कोटींच्या घोटाळ्याचा दावा
समीर वानखेडेंची बाजू भक्कम, ॲड. प्रकाश आंबेडकरांनी दिला मोठा दाखला