निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागते- संजय राऊत

मुंबई | काँग्रेसमध्ये सध्या पक्षाच्या नेतृत्वावरून गजहब सुरू आहे. काँग्रेस पक्षामधील काही नेत्यांनी काँग्रेस पक्षाच्या अध्यक्षांच्या निवडीसह गल्लीपासून ते दिल्लीपर्यंत पक्षात फेरबदल करण्याची मागणी केली आहे. हे सुरू असतानाच खासदार संजय राऊत यांनी शिवसेनेचं मुखपत्र असलेल्या सामनातून काँग्रेसमधील काही नेत्यांवर जोरदार टीका केली आहे.

काँग्रेसमधील 23 नेत्यांनी पत्र लिहित तयार केलेलं वादळ चालूला तरी थंड झालं असं दिसत आहे. परंतू काँग्रेसमध्ये वादळ निर्माण करण्याची क्षमता एखाद्या नेत्यात तरू उरली आहे का?, कारण ज्यांनी पत्र लिहित पुर्णवेळ काम करणाऱ्या व्यक्तिची अध्यक्षपदी नियुक्ती करण्याची मागणी केली. पण ज्यांनी जी मागणी त्यांनीच आचा वयाची सत्तरी पार केली असल्याचं संजय राऊतांनी म्हटलं आहे.

गुलाम नबी आझाद, पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा, कपिल सिब्बल, आनंद शर्मा आणि पी. चिदंबरम हे काँग्रेसचे जुनेजानते नेते आहेत.  कपिल सिब्बल यांनी अनेक वर्षे पक्षाची कायदेशीर बाजू भक्कमपणे सांभाळली मात्र आता त्यांच्यात राजकारणातील सद्दी संपली आहे. अहमद पटेल हे उत्तम ‘मॅनेजर’ किंवा ‘सल्लागार’ आहेत, पण लोकनेते नाहीत. पृथ्वीराज चव्हाण, मिलिंद देवरा यांच्याविषयी आम्ही जास्त काय बोलावं? साताऱ्यात निवडून येण्यासाठी पृथ्वीराज चव्हाणांना शरद पवारांची मदत घ्यावी लागत असल्याचं राऊत यांनी अग्रलेखात म्हटलं आहे.

या सर्व मंडळींनी काँग्रेस पक्षाला कायमस्वरूपी सक्रिय अध्यक्ष हवा अशी मागणी सोनिया गांधींकडे करावी याची गंमत वाटते. आता पक्षाला सक्रिय करायचे म्हणजे काय व पक्षाला सक्रिय करण्यासाठी या ‘पत्रनेत्यां’ना कोणी रोखलं आहे का?, असा सवालही राऊतांनी केला आहे.

पी. चिदंबरम हे वकील पण ते नेते कधी झाले?, राजीव गांधींसोबत त्यांचे मतभेद झाल्यावर याच चिदंबरांनी कांँग्रेसला रामराम ठोकत तामीळनाडूमध्ये आपला स्वत:चा पक्ष निर्माण केला होता. परंतू लोकांनी याला समर्थन न दिल्याने त्यांना आपला पक्ष गुंडाळावा लागला असल्याचंही राऊतांनी म्हटलं आहे.

दरम्यान, काँग्रेसच्या बड्या नेत्यांपैकी एकही नेता देश पातळीवर, राज्य पातळीवर सोडाच, पण जिल्हा पातळीवरदेखील लोकांचा नेता नाही. तरीही यापैकी अनेक नेत्यांनी काँग्रेस किंवा गांधी-नेहरू परिवाराच्या बळावर मुख्यमंत्री पदापासून केंद्रीय मंत्रीपदापर्यंत अनेक महत्त्वाच्या गाद्या मळल्या असल्याचं म्हणत राऊत यांनी त्या नेत्यांवर निशाणा साधला आहे.

महत्वाच्या बातम्या-

‘काँग्रेस पक्षांतर्गत घडणाऱ्या प्रत्येक घटनेची मला खडानखडा माहिती द्या’; पवारांनी काँग्रेसच्या ‘या; नेत्यावर सोपवली जबाबदारी

रिया स्वतः ड्रग्ज घेऊन सुशांतलाही ड्रग्ज घेण्यासाठी प्रवृत्त करत होती?; अंमलीपदार्थ विरोधी पथकाकडून गुन्हा दाखल

“कॉंग्रेस नेत्यांनी पत्राचा विषय संपवून पक्षासाठी संघटन स्तरावर जोमाने काम करावं”

धडाकेबाज अधिकारी तुकाराम मुंढे यांची पुन्हा बदली

‘चहा, कॉफी किंवा पाण्यात ते चार थेंब टाक आणि त्याला ते पिऊ दे’; रियाच्या आणखी एका व्हाट्सअॅप चॅटमुळे खळबळ