खासदार उदयनराजे भोसले अक्षय बोऱ्हाडेच्या पाठीशी; पोलिसांना केलं ‘हे’ आवाहन

सातारा | शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून बेघर, मनोरुग्ण तसेच अनाथांची सेवा करणाऱ्या अक्षय बोऱ्हाडेला बेदम मारहाण करण्यात आली आहे. अक्षयने फेसबुक लाईव्हद्वारे माहिती देताना जुन्नरच्या विघ्नहर सहकारी साखर कारखान्याचे चेअरमन सत्यशील शेरकर यांच्यावर यासंदर्भात आरोप केले आहेत.

खासदार उदयनराजे भोसले यांनी आपल्या फेसबुक पोस्टद्वारे या घटनेचा तीव्र निषेध केला आहे. कोणत्याही राजकीय दबावाला बळी न पडता पोलीस प्रशासनाने याप्रकरणाची सखोल चौकशी करावी आणि गुन्हा दाखल करुन या तरुणाला न्याय मिळवून द्यावा, असं आवाहन देखील त्यांनी केलं आहे.

छत्रपती शिवरायांच्या विचारांचा वसा घेऊन असंख्य बेघर, मनोरुग्ण, अनाथ लोकांचे मनोभावे संगोपन करून त्यांना समाजाच्या मुख्य प्रवाहात आणण्यासाठी स्वताचे आयुष्य वाहून घेणारा जुन्नर तालुक्यातील शिवऋण प्रतिष्ठानच्या माध्यमातून आधार देणारा युवक अक्षय बोऱ्हाडे याला काही राजकीय लोकांकडून बंदुकीचा धाक दाखवून अमानुष मारहाण करण्यात आली. ही घटना संपूर्ण महाराष्ट्रासाठी अतिशय निंदनीय आहे, असं उदयनराजे यांनी म्हटलं आहे.

सामाजिक जीवनात काम करत असताना असंख्य अडचणींचा सामना करावा लागतो हे सर्वज्ञात आहे, परंतु कोणी राजकीय द्वेष तसेच वैयक्तिक कारणास्तव याप्रकारचे हल्ले करत असेल तर हे हल्ले महाराष्ट्राच्या सामाजिक चळवळीस नक्कीच विचलीत करणारे असतील, असंही त्यांनी म्हटलं आहे.

खासदार उदयनराजे यांची फेसबुक पोस्ट-

अक्षय बोऱ्हाडेचा व्हिडीओ-

 

महत्वाच्या बातम्या-

-“एकास तीन हे तर भित्रे, रडव्यांचे लक्षण, करुन दाखवा रडून नको”

-मराठी युवकांकडे कौशल्य नाही म्हणणाऱ्या फडणवीसांना जयंत पाटलांचं सडेतोड प्रत्युत्तर

-फडणवीसजी, महाराष्ट्रापेक्षा गुजरातची अवस्था बिकट आहे- जयंत पाटील

-…म्हणून रेल्वेमंत्र्यांनी एकदम 152 ट्रेन उलट-सुलट सोडल्या- अनिल परब

-खोटं बोल पण रेटून बोल हे महाविकास आघाडी सरकारचं धोरण- देवेंद्र फडणवीस