“…तर शिवसेनेवर ही वेळ आली नसती आणि आदित्य ठाकरेंना रॅली काढावी लागली नसती”

मुंबई | एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी शिवसेना पक्षाला खिंडार पाडून शिवसेनेचे 40 आमदार, 12 खासदार आणि अनेक माजी नेते आणि पदाधिकारी पळवले. त्यानंतर शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे (Uddhav Thackeray) आणि आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) सक्रिय झाले आहेत.

शिवसेनेचे माजी पर्यावरणमंत्री आदित्य ठाकरे यांनी शिवसंवाद यात्रेला सुरुवात केली आहे. ते सध्या महाराष्ट्र दौऱ्यावर आहेत. ते ठिकठिकाणी सभा आणि मेळावे घेत आहेत. त्यात ते एकनाथ शिंदे आणि त्यांच्या गटाचा खरपूस समाचार घेत आहेत.

ते अलीकडे जळगाव दौऱ्यावर जाणार होते. परंतु प्रकती बिघडल्याने त्यांनी हा दौरा रद्द केला. त्यावरुन भाजपने आता शिवसेना पक्षावर टीका केली आहे. जे दोन वर्षांत उद्धव ठाकरे यांना जमले नाही, ते एकनाथ शिंदेंनी आठ दिवसांत करुन दाखवले, असे भाजपचे मत आहे.

भाजप खासदार उन्मेश पाटील (Unmesh Patil) यांनी आदित्य ठाकरेंच्या दौऱ्यावर निशाणा साधत त्यांच्यावर टीका केली आहे. भाजपच्यावतीने चाळीसगावात तिरंगा रॅली (Tiranga Rally) काढण्यात आली, यावेळी पाटील माध्यमांसोबत बोलत होते.

एकीकडे कामांना परवानगी द्यायची नाही, आणि दुसरीकडे निष्ठा यात्रा करायच्या. शेतकऱ्यांच्या भावनांसोबत खेळायचे. शेतकऱ्यांच्या भावनांसोबत खेळण्याचा ठाकरे यांनी अधिकार नाही, असे पाटील यावेळी म्हणाले.

खानदेशातील गिरणा नदीच्या पूलासाठी अनेकदा आदित्य आणि उद्धव ठाकरे यांच्याकडे पाठपूरावा केला, त्यांनी त्यावेळी त्याची दखल घेतली नाही. ही परवानगी जर त्यांनी दिली असती, तर त्यांना खानदेशाच्या मातीशी निष्ठा राखण्याचा आणि बोलण्याचा अधिकार मिळाला असता, असे पाटील म्हणाले.

दरम्यान राजकारण करण्यापेक्षा राज्यातील विकासकामांकडे लक्ष दिले असते, तर शिवसेनेवर ही वेळ आली नसती आणि आदित्य ठाकरेंना रॅली काढावी लागली नसती, असे देखील पाटील म्हणाले.

महत्वाच्या बातम्या –

“प्रत्येक मराठी माणसाचा स्वाभिमान दुखावणारा फोटो, शिंदे साहेब वाईट वाटलं”

टीईटी घोटाळ्याचे धागेदोरे अब्दुल सत्तारांपर्यंत, अत्यंत महत्त्वाची माहिती समोर

बिहारमध्ये राजकीय भूकंप होणार?, नितीश कुमार मोठा निर्णय घेण्याच्या तयारीत

‘ईडीविरोधात काँग्रेस रस्त्यावर, तुम्ही…’; शिवसेनेचा सामनाच्या अग्रलेखातून राष्ट्रवादीला प्रश्न

“चंद्रकांत खैरे यांच्या डोक्यावर परिणाम झालाय”