अमृता फडणवीसांनी गायलं मनसेचं प्रचारगीत? ‘बाई आला गं मनसेचा सेनापती’; पहा व्हीडिओ-

मुंबई : मिसेस मुख्यमंत्री अर्थात अमृता फडणवीस यांनी मनसेचा प्रचार करत असल्याचा व्हिडीओ फेक असून मूळ व्हिडीओशी छेडछाड करुन तयार करण्यात आल्याचं उघड झालं आहे. अमृता फडणवीस यांनी मुंबई पोलिसांसाठी आयोजित चॅरिटी कार्यक्रम ‘उमंग 2018’ मध्ये ‘फिर से’ या गायलेल्या गाण्याच्या व्हीडिओला एडिट करुन त्यामध्ये बॅकग्राऊण्डला मनसेच्या गाण्याचा ऑडिओ टाकण्यात आल्याचं स्पष्ट झालं आहे.

मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या पत्नी अमृता फडणवीस यांना पार्श्वगायनात रस असल्याची कल्पना सर्वांनाच आहे. त्यांनी फक्त महाराष्ट्रातच नव्हे, तर आंतरराष्ट्रीय पातळीवरही आपला ठसा उमटवला आहे. मिसेस मुख्यमंत्र्यांचे काही म्युझिक व्हीडिओही रिलीज झाले आहेत. अमृता फडणवीसांच्या आवाजावर रसिक प्रेक्षकांच्या पसंतीची मोहोर उमटली आहे.

अमृता फडणवीस मनसेच्या प्रचारासाठी गाणं गात असल्याचा व्हीडिओ सोशल मीडियावर वायरल झाला आणि एकच खळबळ उडाली. भाजपवर घणाघात करणाऱ्या मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा प्रचार अमृता फडणवीस कसा करु शकतात, असा प्रश्नही अनेकांच्या मनात आला. अखेर या व्हीडिओची सत्यता फॅक्ट क्रेसेंडो मराठी या फेसबुक पेजने पडताळून पाहिली.

अमृता फडणवीस मुख्यमंत्र्यांशिवाय इतरही उमेदवारांच्या प्रचाराला जाणार असल्याचं त्यांनीच पूर्वी सांगितलं होतं. यामुळे येत्या विधानसभा निवडणुकीत भाजपच्या स्टार प्रचारकांच्या लिस्टमध्ये आता अमृता फडणवीस यांच्या नावाचाही समावेश केला जाण्याची शक्यता वर्तवण्यात येत आहे.

दरम्यान, अमृता फडणवीस यापूर्वी त्यांच्या सेल्फीमुळे वादात अडकल्या होत्या. मुंबई ते गोवा या जलमार्गावरील आंग्रीया क्रूझच्या डेकवर टोकाला जाऊन सेल्फी काढला होता. सुरक्षारक्षकांना डावलून त्यांनी सेल्फी घेतल्याने त्यांच्यावर टीका झाली होती.

https://www.facebook.com/FactCrescendoMarathi/videos/394007941286143/

महत्वाच्या बातम्या-