“मिसेस वाड्रा, शाळेतल्या मुलींना बिकिनी घालण्यास…”, शर्लिन चोप्राचं टीकास्त्र

मुंबई | कर्नाटकच्या उडपीमधील एका शाळेत मुलींनी हिजाब घातला म्हणून शाळेत प्रवेश नाकारण्यात आला होता. त्यानंतर कर्नाटकात मोठा धार्मिक राडा झाल्याचं पहायला मिळालंय.

कर्नाटकचा मुद्दा आता राष्ट्रीय स्तरावर गाजत असल्याचं दिसतंय. देशभरातून वेगवेगळ्या प्रतिक्रिया येताना दिसत आहेत. अशातच काँग्रेसच्या नेत्या प्रियंका गांधी यांनी प्रतिक्रिया दिली होती.

बिकिनी असो, बुरखा असो, जीन्स असो की हिजाब असो, तिने काय घालायचे हे ठरवण्याचा अधिकार स्त्रीचा आहे, असं प्रियंका गांधी यांनी म्हटलं आहे.

त्यावर आता वाद सुरू झाल्याचं पहायला मिळतंय. प्रियांका गांधी यांनी ट्विट करून सर्वांसमोर आपली बाजू मांडली होती, तेव्हा बॉलिवूड अभिनेत्री शर्लिन चोप्राने ट्विट रिट्विट करत बिकिनीवर प्रश्न उपस्थित केले आहेत.

मिसेस वाड्रा, तुमच्या भारतीय राज्यघटनेच्या व्याख्येनुसार, मुलींना शैक्षणिक संस्थांमध्ये बिकिनी घालण्याची परवानगी आहे का?, असा सवाल शर्लिनने विचारला आहे.

माझ्याकडे अनेक आहेत आणि आवश्यक असल्यास ते दान करण्यास मला आनंद होईल, असंही शार्लिन यावेळी म्हणाली आहे. शर्लिनच्या या वक्तव्यावर आता चांगलाच वाद पेटण्याची शक्यता आहे.

दरम्यान, काँग्रेसने यावेळी उत्तर प्रदेशात महिला कार्ड वापरल्याचं पहायला मिळतंय. त्यामुळे प्रियंका गांधींचं हे वक्तव्य किती प्रमाणात परिणामकारक ठरणार हे पाहणं महत्त्वाचं ठरणार आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

“भगवा हा आपला राष्ट्रध्वज होईल अन् लाल किल्ल्यावर भगवा फडकेल”

 “हा पुरूषार्थ आहे का?”; हिजाब प्रकरणावर जावेद अख्तर यांची संतप्त प्रतिक्रिया

 मनसेचं ठरलंय! “आम्ही किंग मेकर नाही तर किंग बनणार”

“कोरोनाला हलक्यात घेऊ नका, कारण…”; भारतीयांना अत्यंत धक्कादायक इशारा जारी

कर्नाटक हिजाब प्रकरणावर हेमा मालिनी यांचं मोठं वक्तव्य, म्हणाल्या…