MS Dhoni ED l IPL 2024 पूर्वी MS धोनीला बसला मोठा धक्का; त्या कंपनीवर ED चा छापा

MS Dhoni ED l भारतीय क्रिकेट संघाचा माजी कर्णधार आणि अनुभवी यष्टीरक्षक एमएस धोनी ज्या कंपनीत काम करतो त्या कंपनीवर अंमलबजावणी संचालनालयाने म्हणजेच ईडीने छापा टाकला आहे. सूत्रांनी दिलेल्या माहितीनुसार, चेन्नई येथे मुख्यालय असलेल्या इंडिया सिमेंट या सिमेंट कंपनीच्या कार्यालयात ईडीचे पथक झडती घेत आहे. एमएस धोनी गेल्या अनेक वर्षांपासून या कंपनीशी संबंधित आहे. सर्वात महत्वाचं म्हणजे इंडिया सिमेंट्स लिमिटेड हे इंडियन प्रीमियर लीगमधील 5 वेळा चॅम्पियन चेन्नई सुपर किंग्जचे मालक आहेत.

इंडिया सिमेंट्स लिमिटेड ही एन श्रीनिवासन यांच्या मालकीची आहे. जे यापूर्वी आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषद आणि भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष देखील राहिले आहेत. याशिवाय तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनमध्ये देखील श्रीनिवासन यांची राजवट दीर्घकाळ कायम राहिली आहे. सूत्रांकडून मिळालेल्या माहितीनुसार, ईडीचा हा छापा फेमा कायद्याअंतर्गत (फॉरेन एक्स्चेंज मॅनेजमेंट ॲक्ट) घातला जात आहे, जो विदेशी पैशांच्या व्यवहारांशी संबंधित आहे. कंपनीचे एमडी एन श्रीनिवासन यांच्या घरीही ईडीची टीम हजर आहे.

MS Dhoni ED l 2008 मध्ये आयपीएल फ्रँचायझी विकत घेतली :

तब्बल 7700 कोटी रुपयांच्या मार्केट कॅपसह इंडिया सिमेंट्सने 2008 मध्ये इंडियन प्रीमियर लीगमध्ये चेन्नई फ्रँचायझी विकत घेतली होती. त्यानंतर फ्रँचायझीने यासाठी बीसीसीआयला 9 कोटी डॉलरहून अधिक फी भरली होती. तसेच पहिल्याच लिलावात महेंद्रसिंग धोनीला सर्वाधिक किमतीत विकत घेऊन त्याची कर्णधारपदी नियुक्ती करण्यात आली. तेव्हापासून धोनी या फ्रँचायझीचा भाग आहे आणि संघाचा कर्णधार आहे.

चेन्नईचा कर्णधार (CSK) म्हणून एमएस धोनीचे यश आणि श्रीनिवासन यांच्याशी असलेल्या घनिष्ट संबंधांमुळे 2012 मध्ये त्याला इंडिया सिमेंट्समध्ये कर्मचारी म्हणून समाविष्ट करण्यात आले आहे. त्यानंतर धोनीची कंपनीत उपाध्यक्ष (मार्केटिंग) म्हणून नियुक्ती करण्यात आली. त्यावेळच्या नियुक्ती पत्रानुसार धोनीला 43,000 रुपयांच्या पेमेंटवर ठेवण्यात आले होते आणि विविध भत्त्यांसह त्याला 1.70 लाख रुपयांपेक्षा जास्त मासिक वेतन मिळत होते.

MS Dhoni ED l श्रीनिवासन यांचे क्रिकेटशी दीर्घ नाते :

कंपनीचे मालक आणि व्यवस्थापकीय संचालक श्रीनिवासन यांचा संबंध क्रिकेटशी आहे. ते दीर्घकाळ तामिळनाडू क्रिकेट असोसिएशनचे अध्यक्ष आहेत. 2011 ते 2013 पर्यंत ते बीसीसीआयचे अध्यक्षही होते. यानंतर त्याने आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेत प्रवेश केला, जिथे तो पहिला अध्यक्ष बनला. 2014 ते 2015 पर्यंत ते या पदावर होते.

News Title : MS Dhoni ED News

महत्वाच्या बातम्या – 

Agriculture Budget 2024 | अर्थसंकल्पात शेतकऱ्यांसाठी काय? दुग्धोत्पादकांपासून मिळालं बरचं काही

Why budget briefcase is red l अर्थसंकल्प लाल कापड किंवा लाल सूटकेसमध्ये का आणला जातो? जाणून घ्या यामागचे कारण

Budget 2024 LIVE l अर्थसंकल्प कसा तयार केला जातो? थेट प्रक्षेपण कधी आणि कुठे पाहाल?

Ramayan l ‘रामायण’ मालिका पुन्हा येणार प्रेक्षकांच्या भेटीला! या वाहिनीवर पाहता येणार

RBI Paytm Bank l Paytm बंद झाल्यानंतर अकाऊंटमधील पैशांचं काय होणार?