आयपीएलच्या पहिल्याच सामन्यात MS Dhoni असं काही करणार की चाहते होणार खुश!

MS Dhoni Ipl Record Break l यंदाच्या वर्षी आयपीएलचा हंगाम 22 मार्चपासून सुरू होत आहे. या हंगामात पहिला सामना हा चेन्नई सुपर किंग्ज आणि आरसीबी यांच्यात होणार आहे. चेपॉकमध्ये खेळल्या जाणाऱ्या आयपीएल 2024 च्या पहिल्या सामन्यापासूनच खळबळ उडाली आहे. पहिल्याच सामन्यात महेंद्रसिंग धोनी एका मोठ्या विक्रमाचे लक्ष्य गाठणार आहे. मात्र त्यासाठी धोनीला काही धावा कराव्या लागणार आहेत. तर धोनी नेमका विक्रम करणार आहे हे जाणून घेऊयात..

MS Dhoni Ipl Record Break l MS धोनी मोठा विक्रम करण्यास सज्ज! :

42 वर्षीय धोनी RCB विरुद्ध खेळल्या जाणाऱ्या IPL 2024 च्या पहिल्या सामन्यात 43 धावा करून एक मोठा विक्रम करणार आहे. जर धोनीने पहिल्या सामन्यात (MS dhoni) 43 धावा केल्या तर तो CSK चा दुसरा क्रिकेटर आणि IPL संघाकडून खेळताना 5000 धावा पूर्ण करणारा चौथा क्रिकेटर बनणार आहे. धोनीने सीएसकेकडून खेळताना आतापर्यंत आयपीएलमध्ये 4957 धावा केल्या आहेत. जर त्याने 43 धावा केल्या तर सीएसकेसाठी अशी कामगिरी करणारा तो सुरेश रैनानंतरचा दुसरा खेळाडू ठरणार आहे.

आत्तापर्यंत एबी डिव्हिलियर्स आणि ख्रिस गेल यांनाही त्यांच्या आयपीएल फ्रँचायझीसाठी ही कामगिरी करता आलेली नाही. केवळ विराट कोहली, रोहित शर्मा, सुरेश रैना आणि इतर अनेक खेळाडूंनी कोणत्याही एका आयपीएल संघासाठी 5000 पेक्षा जास्त धावा केल्या आहेत. विराट कोहलीने आरसीबीकडून खेळताना आतापर्यंत एकूण 7263 धावा केल्या आहेत. तर सुरेश रैनाने सीएसकेसाठी 5529 धावा केल्या आहेत

MS Dhoni Ipl Record Break l आयपीएलमध्ये संघासाठी सर्वाधिक धावा करणारे क्रिकेटपटू! :

1. विराट कोहली- 7263 धावा

2. सुरेश रैना- 5529 धावा

3. रोहित शर्मा- 5314 धावा

4. एमएस धोनी- 4957 धावा.

News Title : MS Dhoni Ipl Record Break

महत्त्वाच्या बातम्या-

भारतीय नागरिकत्व मिळवण्यासाठी अशाप्रकारे करा ऑनलाईन अर्ज; जाणून घ्या सोपी प्रोसेस

सरकारने दिला मोठा दिलासा, आता ‘या’ तारखेपर्यंत मोफत आधार कार्ड अपडेट करू शकता

उद्यापासून सुरु होतोय खरमास; जाणून घ्या खरमासमध्ये काय करू नये

आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी कौटुंबिक खर्च आटोक्यात ठेवावा

तरुणांचं सरकारी नोकरी करण्याचं स्वप्न होणार साकार! या विभागात भरती प्रक्रिया सुरु