मुकेश अंबानींनी खरेदी केली देशातील सर्वात महागडी कार, किंमत वाचून तुम्हालाही बसेल शाॅक

मुंबई | अदानी समूहाचे अध्यक्ष गौतम अदानी हे आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहेत. त्यांनी रिलायन्स इंडस्ट्रीजचे चेअरमन मुकेश अंबानी यांना मागं टाकलंय.

भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्तींपैकी एक आणि रिलायन्स इंडस्ट्रीजचे मालक मुकेश अंबानी त्यांच्या कारसाठी प्रसिद्ध आहेत. त्यांना गाड्यांची चांगली जाण देखील आहे.

अशातच मुकेश अंबानी यांनी आता एक नवीन ‘रोल्स रॉयस एसयूव्ही’ खरेदी केली आहे, जी भारतातील सर्वात महागडी कार आहे.

अधिकाऱ्यांनी दिलेल्या माहितीनुसार ही देशातील सर्वात महागडी कार आहे, जेवढी मारुतीच्या ब्रेझा या कारच्या किंमतीत 130 गाड्या बसू शकतात.

मुकेश अंबानी यांनी एक अल्ट्रा-लक्झरी रोल्स रॉयस हॅचबॅक खरेदी केली आहे, ज्याची किंमत तब्बल 13.14 कोटी रूपये आहे.

रॉल्स रॉयस कलिनन पेट्रोल मॉडेल कारची रिलायन्सने 31 जानेवारी रोजी दक्षिण मुंबईतील तारदेव RTO येथे नोंदणी केली होती.

2018 मध्ये पहिल्यांदा ही कार लॉन्च करण्यात आली होती. तेव्हा कारची मूळ किंमत 6.95 कोटी रूपये होती. परंतु, त्यानंतर कारच्या मूल्यात लक्षणीय वाढ करण्यात आली आहे.

दरम्यान, मुकेश अंबानी यांच्या कारच्या ताफ्यात आता शानदार रोल्स रॉयस एसयूव्ही शामिल झाली आहे. या कार साठी अंबानींनी 20 लाख रूपयांचा टॅक्स देखील भरलाय.

महत्त्वाच्या बातम्या – 

आमदार नितेश राणेंची तब्येत पुन्हा बिघडली, आता रुग्णवाहिकेने कोल्हापूरला नेणार

 मोठी बातमी! लता मंगेशकर यांच्या प्रकृतीबाबत महत्त्वाची माहिती समोर

‘या’ महिन्यापर्यंत कोरोनाची तिसरी लाट संपणार; ICMR ने दिली महत्वाची माहिती 

“तुमच्यासारख्या टॅलेंटेड नागरिक दिल्लीत बोलल्या तर…” 

काळजाचा ठोका चुकवायला लावणाऱ्या डॉ. सुवर्णा वाजेप्रकरणाचं गूढ उकललं!