अब्जाधीश असला म्हणून काय झालं तोही ढसाढसा रडला; कारण तो एका मुलीचा बाप आहे!

मुंबई : भारतातील सर्वात श्रीमंत उद्योगपती मुकेश अंबानी यांची मुलगी ईशाचा विवाहसोहळाच नुकताच संपन्न झाला. उद्योगपती अजय पीरामल यांचा मुलगा आनंद पीरामलसोबत ती विवाहबद्ध झाली. 12 डिसेंबर रोजी दोघे विवाहबंधनात अडकले. संपूर्ण जगाचं लक्ष या सोहळ्याकडे लागलं होतं. जगभरातील अनेक तारे-तारकांनी या सोहळ्याला हजेरी लावली. जगातले अनेक राजकारणी देखील या सोहळ्याला हजर होते. जगातील सर्वात चर्चित असलेल्या लग्नांपैकी हे एक लग्न ठरलं. या सोहळ्याचा तामझाम पाहण्याजोगा होता. या सोहळ्याच्या अनेक व्हीडिओ सोशल मीडियावर व्हायरल झाले. यावेळचा झगमगाट पाहून अनेकांचे डोळे दिपले. पहाटे 4 वाजता नवरी मुलीची विदाई झाली.

लता मंगेशकर यांनी दिले खास आशीर्वाद- 

गानसम्राज्ञी लता मंगेशकर यांनी या विवाहसोहळ्याला खास हजेरी लावली. त्यांनी फक्त हजेरीच लावली नाही तर नवविवाहित जोडप्याला त्यांच्या सुरेल आवाजातून शुभेच्छाही दिल्या आहेत. या शुभेच्छा चर्चेचा विषय ठरल्या आहेत. गायंत्री मंत्र रेकॉर्ड केलेला व्हिडीओ त्यांनी शेअर केला आहे. या व्हिडीओतून लग्नातले खास प्रसंगही दाखवण्यात आले आहेत.

मुकेश अंबानी झाले भावुक-

श्रीमंत असो किंवा गरीब बाप हा बाप असतो. मुकेश अंबानी यांच्यातला बापही त्यांच्या मुलीच्या लग्नसोहळ्याच्या निमित्ताने जगाला पाहायला मिळाला. मुलीच्या गळ्यात वरमाला टाकताच मुकेश अंबानी यांच्या डोळ्यात अश्रू तरळले. त्यांच्या बाजूलाच उभ्या असलेल्या नीता अंबानीही अत्यंत भावूक झाल्या होत्या.

या लग्नासाठी अमेरिकेच्या माजी फर्स्ट लेडी हिलरी क्लिंटन यांचीही उपस्थिती होती. शिवाय माजी राष्ट्रपती प्रणब मुखर्जी, गृहमंत्री राजनाथ सिंह, पश्चिम बंगालच्या मुख्यमंत्री ममता बॅनर्जी, आंध्र प्रदेशचे मुख्यमंत्री चंद्राबाबू नायडू यांचीही उपस्थिती होती.

अँटिलिया नव्या नवरीसारखी सजली-

मुकेश अंबानींची मुंबईतील अँटिलिया ही 27 मजली बिल्डिंगसुद्धा या लग्नासाठी खास पद्धतीने सजवण्यात आली होती. एखाद्या नव्या नवरीसारखी ही बिल्डिंग सजवण्यात आली होती. घरच्या प्रवेशद्वारापासून ते घराच्या आतपर्यंत विविध ही  फुलांनी सजावट करण्यात आली होती. घराच्या परिसरातील रस्तेही सजवल्यामुळे सौंदर्य आणखी वाढलं होतं. अंबानी कुटुंबीयांच्या या लग्नातल्या पाहुण्यांची यादी मोठी आहे. भारतच नव्हे तर जगभरातून या लग्नसोहळ्यासाठी पाहुणे आले होते. अंबानींनी या लग्नासाठी कोट्यवधींचा खर्च तर केलाच, शिवाय अन्नदानाचाही कार्यक्रम ठेवला होता.

पाहा व्हीडिओ-

आणखी महत्त्वाच्या घडामोडी-