मुंबई| कोरोनामुळे शेअर बाजारात आलेल्या मंदीचा परिणाम रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांच्यावरही झाला आहे. त्यांना मोठ्या प्रमाणात नुकसान सोसावं लागलं आहे. मुकेश अंबानी यांच्या संपत्तीत तब्बल 44 हजार कोटी रूपयांची घट झाल्याचं कळतंय
सोमवारी कच्च्या तेलाच्या किंमतीत मोठ्या प्रमाणात घसरण झाली. त्यानंतर रिलायन्सच्या शेअर्समध्येही घसरण झाल्याचं पहायला मिळालं होतं.
सौदी अरेबिया आणि रशियादरम्यान कच्च्या तेलावरून दरयुद्ध सुरू आहे. त्याचा परिणाम कच्च्या तेलाच्या किंमतीवर झाला असून आंतरराष्ट्रीय बाजारपेठेत कच्च्या तेलाची किंमत 31 टक्क्यांपर्यंत कमी झाली आहे. कच्च्या तेलाच्या दरात नंतर झालेली ही सर्वात मोठी घसरण आहे.
जगभरात कोरोना संसर्गाचं थैमान सुरु असताना याच्या थेट झळा भारतालाही बसल्या आहेत. देशभरात 40 हून अधिक कोरोना रुग्ण आढळले आहेत. आता महाराष्ट्रातही कोरोनाने शिरकाव केला आहे.
महत्वाच्य बातम्या-
-काँग्रेसला मोठा झटका! ज्योतिरादित्य शिंदे यांचा काँग्रेस पक्षाला रामराम
-पुण्याच्या दाम्पत्याला कोरोनाची लागण, दोघेही पॉझिटिव्ह- राजेश टोपे
-“आता गणेश नाईकांचा छा… छैया बघायला तयार राहा”
-पुण्यातील आयटी कंपन्यांच्या कर्मचाऱ्यांना ‘वर्क फ्रॉम होम’च्या सूचना
-गो कोरोना, कोरोना गो… रामदास आठवलेंची चीनी नागरिकांसोबत घोषणाबाजी; पाहा व्हिडीओ