आज लाँच होणार रिलायन्सचं जिओ गिगाफायबर; ‘अशी’ करा नोंदणी

मुंबई : रिलायन्स आज जिओ फायबर लाँच करणार आहे. अगोदर याचं नाव गिगाफायबर होतं. आता जिओ फायबर झालंय. हे लाँच झाल्यानं ब्राॅडब्रँड सेवांमध्ये बराच बदल येणार आहे. रिलायन्स जिओ फायबरच्या लाँचची घोषणा रिलायन्स इंडस्ट्रीच्या एजीएममध्ये 12 ऑगस्टला करण्यात आली होती.

जिओ फायबरचे इंटरनेट प्लान्स 700 रुपयांपासून सुरु होणार आहे. अवघ्या 700 रुपयांमध्ये ग्राहकांना सुपरफास्ट इंटरनेट सर्विस मिळणार आहे.

जिओ फायबरचा स्पीड 100 एमबीपीएस असणार आहे. मुकेश अंबानी यांनी रिलायन्सच्या वार्षिक सर्वसाधारण बैठकीमध्ये याबाबतची घोषणा केली होती. गेल्या अनेक दिवसांपासून ग्राहक जिओ फायबरच्या प्रतिक्षेत आहेत.

रिलायन्स कंपनी सुरुवातीला 1600 शहरांमध्ये जिओ फायबर कनेक्शन देणार आहे. या शहरामधील 15 दशलक्ष ग्राहकांनी जिओ फायबरसाठी नोंदणी केली आहे.

दरम्यान, जिओ गीया फायबरसाठी नोंदणी 15 ऑगस्टपासून सुरु झाली आहे. ज्या ग्राहकांना या ब्रॉडबँड सर्विसची बुकिंग करायची असेल ते कंपनीच्या अधिकृत वेबसाइट jio.com किंवा My Jio App हून करू शकतात.

महत्वाच्या बातम्या-