मुंबई : रिलायन्स समुहाचे चेयरमन मुकेश अंबानी सलग आठव्या वर्षी सर्वात श्रीमंत भारतीयांच्या यादीत आघाडीवर आहेत. त्यांची एकूण संपत्ती 3,80,700 कोटी रुपये इतकी आहे.
आयआयएफएल वेल्थ हुरुन इंडियाच्या श्रीमंतांच्या यादीनुसार लंडन येथील एसपी हिंदुजा आणि त्यांचं कुटुंब 1,86,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत या यादीत दुसऱ्या क्रमांकावर आहे. तर विप्रोचे अजीम प्रेमजी या यादीत तिसऱ्या स्थानावर आहे. त्यांची एकूण संपत्ती 1,17,100 कोटी रुपये आहे.
भारतीय श्रीमंतांच्या यादीत आर्सेलरमित्तलचे सीईओ लक्ष्मी निवास मित्तल 1,07,300 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत चौथ्या क्रमांकावर आहेत. तर 94,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत गौतम अडाणी पाचव्या स्थानावर आहेत. 94,100 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत उदय कोटक सहाव्या स्थानावर आहेत.
88,800 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत सायरस एस पूनावाला सातव्या स्थानावर आहेत. 76,800 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत सायरस पल्लोनजी मिस्त्री आठव्या क्रमांकावर आहेत.
76,800 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत शापोरजी पल्लोनजी नवव्या स्थानावर आहेत. तर, 71,500 कोटी रुपयांच्या संपत्तीसोबत दिलीप सांघवी दहाव्या स्थानावर आहेत.
महत्वाच्या बातम्या-
शरद पवारांवर झालेल्या ईडीच्या कारवाईवर रावसाहेब दानवे म्हणतात…- https://t.co/TvHgsGdOwA #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 25, 2019
“उदयनराजेंविरोधात लढलो मग पवारांना तरी का सोडू???”- https://t.co/oZp1Q6IGh7 #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 25, 2019
तेव्हा जाणते राजे घरी पळून गेले होते; सुजात आंबेडकरांची शरद पवारांवर टीका – https://t.co/a95rg7soxE #म
— महाराष्ट्र केसरी (@MahaKesariNews) September 25, 2019