रिलायन्सच्या मुकेश अंबानींचं एक पाऊल पुढे; आता इंग्रजांची ‘ही’ बडी कंपनी घेणार ताब्यात!

नवी दिल्ली | आपला व्यवसाय वाढविण्यासाठी अनेक जण आजूबाजूला विविध संधीच्या शोधात असतात. अगदी त्याचप्रकारे रिलायन्स इंडस्ट्रीज ब्रिटनमधील २४२ वर्ष जुनी असलेली एक डिपार्टमेंटल स्टोर विकत घेण्याच्या तयारीत आहे.

ब्रिटनमधील Debenhams या बहुराष्ट्रीय रिटेल चेनसोबत रिलायन्स रिटेलची चर्चा सुरू आहे. या महिन्याच्या अखेरीस हा करार पूर्ण होण्याची शक्यता आहे.

सध्या ब्रिटनमधील हे डिपार्टमेंटल स्टोर खूपच बिकट परिस्थितीतून जात आहे. त्यातच रिलायन्स समूह या बहुराष्ट्रीय रिटेल कंपनीला घेण्यास उत्सुक आहे आणि त्या दिशेने त्यांनी पाऊलही टाकले आहे.

एका माहितीनुसार रिलायन्स इंडस्ट्रीज या डिपार्टमेंटल स्टोरला खरेदी करण्यासाठी खूपच गंभीर आहे. Debenhams या कंपनीची मालकी सध्या एका सावकारांच्या समूहाकडे आहे.

एप्रिल महिन्यापासून ते प्रशासनाकडे असून संभाव्य खरेदीदारांच्या चर्चेसाठी लेझार्डमधील गुंतवणूकदाराकडे याची जबाबदारी सोपावण्यात आली आहे, असं स्काय न्यूजने सांगितलं आहे. सध्या कोरोना संकटात कंपनीला विकण्याव्यतिरिक्त अन्य कोणताही पर्याय उरलेला नाही.

ब्रिटनमधील इन्व्हेस्टमेंट बँकर लेझार्ड, एक फायनान्शियल अ‌ॅडवायजर आणि एक असेट मॅनेजमेंट कंपनी असे सर्व मिळून हा करार पुढे सरकवत आहे. ऑगस्टमध्ये Debenhams मधील २५०० लोकांच्या नोकरीत कपात केली आहे.

सध्या कोरोनामुळे हे स्टोर बंद असल्याने त्यांना खूपच आर्थिक नुकसान सहन करावे लागले आहे. याआधी रिलायन्स ब्रँड्सने २०१९ च्या जुलैमध्ये ब्रिटनची सर्वात प्रसिद्ध खेळणी बनवणारी Hamleys कंपनी ६२० कोटींमध्ये विकत घेतली आहे.

सध्या कोरोना संकटामुळे आणि टाळेबंदीमुळे अनेक व्यवसाय कोलमडले आहे, पण त्यातही रिलायन्स इंडस्ट्रीजच्या नफ्यात वाढ होत आहे. टाळेबंदीत रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये तब्बल १.९ लाख कोटी रुपयांची गुंतवणूक झाली आहे. त्यामुळे मुकेश अंबानी यांची रिलायन्स रिटेल ही कंपनी खरेदी करण्याच्या तयारीत आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

दोन कॅच सोडल्याने सामना गमवावा लागला; आता कोहलीला दंडही भरावा लागणार!

सुशांतसिंग प्रकरण : कोण आहे सिमोन खंबाटा?, का आली एनसीबीच्या रडारवर?

पैशाच्या हव्यासापोटी मित्राला बायकोसोबत जे करायला लावलं त्यानं प्रत्येकाचा थरकाप उडेल!

पुण्याच्या जम्बो कोविड सेंटरमध्ये घडला असा प्रकार; साऱ्या पुण्यात उडाली खळबळ

आता गाडी विकत घेण्याची गरज नाही; मारुती-सुझुकीनं आणली ही जबरदस्त ऑफर