रिलायन्स जिओच्या संचालक पदावरून मुकेश अंबानींची पायउतार, आकाश अंबानीकडे सोपवली मोठी जबाबदारी

नवी दिल्ली | महाराष्ट्राच्या राजकारणात सध्या मोठी उलथापालथ पाहायला मिळत आहे. त्यात आता उद्योगक्षेत्रातून देखील अत्यंत महत्त्वाची माहिती समोर येत आहे.

रिलायन्स इंडस्ट्रीजचे सर्वेसर्वा मुकेश अंबानी यांनी रिलायन्स जिओच्या संचालक पदाचा राजीनामा दिला आहे. हा निर्णय 27 जूनपासून लागू झाला आहे.

पंकज मोहन पवार कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक म्हणून आता कार्यभार सांभाळणार आहेत. तर रामलिंग सिंह गुजराल आणि के व्ही चौधरी यांची स्वतंत्र संचालक म्हणून नियुक्ती करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांचे पुत्र आकाश अंबानी यांच्यावर देखील महत्त्वाची जबाबदारी सोपवण्यात आली आहे. आकाश अंबानींना कंपनीच्या संचालक मंडळाचे अध्यक्ष म्हणून निवड झाल्याची घोषणा करण्यात आली आहे.

मुकेश अंबानी यांनी 2021 मध्येच कंपन्यांची जबाबदारी नवीन पिढीकडे सोपवली जाईल, असे जाहीर केले होते. त्यानंतर आता कंपनीकडून नव्या नियुक्त्या करण्यात आल्या आहेत.

दरम्यान, रिलायन्स जिओ इन्फोकॅमने आज या बदलांची घोषणा केली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

“घरातील मोठा भाऊ असावा तर तो उद्धव ठाकरेंसारखा असावा”

‘आमदार संपर्कात आहेत तर नावं सांगा’, एकनाथ शिंदेंचं उद्धव ठाकरेंना खुलं आव्हान

‘आदित्यला आक्रमक दाखवण्याचा प्रयत्न, पण कार्टुनमध्येही…’; निलेश राणेंचा टोला

‘आजचा शेवटचा दिवस असेल…’; बंडखोर आमदाराचा गुवाहाटीतून उद्धव ठाकरेंना इशारा

“तुम्ही वर्षा सोडलं, मंत्रालयात जात नाही, मातोश्रीत कोणाला एन्ट्री नाही मग राज्य कोण चालवतंय?”