Top news देश

मुकेश अंबानी प्रत्येक तासाला कमवत आहेत 90 कोटी रुपये, एकुण संपत्ती ऐकाल तर हैराण व्हाल!

नवी दिल्ली | काही महिन्यांपूर्वी जगातील श्रीमंत लोकांची यादी प्रसिद्ध झाली होती. या यादीमध्ये मोठ-मोठ्या तंत्रज्ञान कंपन्यांच्या व्यक्तींची नावं होती. यात प्रामुख्याने अमेरिकेतील व्यक्तींचा समावेश आहे, पण या यादीत चौथ्या स्थानावर एकमेव भारतीय होता, त्या व्यक्तीचे नाव मुकेश अंबानी आहे.

Hurun India Rich List 2020 मध्ये सलग नवव्या वर्षी मुकेश अंबानी हे भारतातील सर्वात श्रीमंत व्यक्ती ठरले आहे. मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती तब्बल ६,५८,४०० कोटी रुपये आहे. या एकूण संपत्तीतील रिलायन्स इंडस्ट्रीजचा वाटा सर्वाधिक जास्त आहे.

जागतिक पातळीवरही मुकेश अंबानी पहिल्या पाचमधील केवळ एकमेव भारतीय आहे. हुरून इंडिया यादीमध्ये ३१ ऑगस्ट २०२० पर्यंत १००० कोटींपेक्षा अधिक संपत्ती असलेल्या देशातील व्यक्तींची नावे आहे. २०२० च्या यादीत भारतातील ८२८ व्यक्तींचा समावेश आहे.

लंडनस्थित असलेले एसपी हिंदुजा बंधू, या तीन भावांची संयुक्त संपत्ती १,४३,७०० कोटी रुपये आहे. या संपत्तीसह या यादीत ते दुसऱ्या स्थानावर आहे. एचसीएलचे संस्थापक शिव नाडर १,४१,७०० कोटी रुपयांच्या संपत्तीसह तिसऱ्या स्थानावर आहे.

या यादीत चौथ्या स्थानावर गौतम अदानी आहे. विप्रोचे अझीम प्रेमजी हे पाचव्या स्थानावर आहे. एव्हेन्यू सुपरमार्केटचे संस्थापक राधाकिशन दमानी पहिल्या दहामध्ये असून ते सातव्या क्रमांकावर आहे. पहिल्या दहामध्ये सीरम इन्स्टिट्यूट ऑफ इंडियाचे सायरस एस. पूनावाला यांचा देखील समावेश आहे.

तसेच पहिल्या दहामध्ये कोटक महिंद्राचे उदय कोटक, सन फार्माचे दिलीप शांघवी, शापूरजी पालनजी ग्रुपचे सायरस पालनजी मिस्त्री आणि शापूर पालनजी मिस्त्री आदींचा समावेश आहे. या यादीमध्ये ५ टक्के महिलांचाही समावेश आहे.

क्रिश यांची व्यक्तीगत संपत्ती ३२,४०० कोटी रुपये आणि शॉ यांची ३१,६०० कोटी रुपये आहे. या भारतातील सर्वात श्रीमंत महिला आहे. आयआयएफएल वेल्थ हुरून इंडिया रिच लिस्ट २०२० च्या अहवालानुसार भारत आणि आशियातील सर्वात श्रीमंत व्यक्ती मुकेश अंबानी आहे.

देशात टाळेबंदी लागू झाल्यानंतर प्रत्येक तासाला त्यांच्या संपत्तीत ९० कोटी रुपयांची वाढ झाली आहे. ही भारतीयच नव्हे जगभरातील लोकांसाठी खूप आश्चर्याची बाब मानली जात आहे.

मागच्या वर्षी मुकेश अंबानी यांची एकूण संपत्ती २,७७,७०० कोटी रुपये होती. पण या वर्षी ही संपत्ती वाढून तब्बल ६,५८,४०० कोटी रुपये झाली आहे.

या यादीतील ८२८ सर्व भारतीयांची संपत्ती मिळून ६०,५९,५०० कोटी रुपये होतात. हीच संपत्ती मागच्या वर्षी १०,२९,४०० कोटी रुपये होती. पण यावर्षी रिलायन्स इंडस्ट्रीजच्या शेअरमध्ये तेजीने वाढ झाली, यामुळे एकूणच यात सहा पटीने वाढ झाली आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

सुशांतला वि.ष दिलं गेलं होतं? मेडिकल रिपोर्टनं केला धक्कादायक खुलासा!

सुरक्षित इंटरनेट बँकिंगचा वापर करण्यासाठी ‘या’ सहा टिप्स नक्की जाणून घ्या…

एकनाथ खडसे भाजप सोडणार?; कार्यकर्त्यांसोबत बोलतानाची कथित ऑडिओ क्लिप व्हायरल

“माल म्हणजे काय?”, दीपिकाच्या उत्तराने हैराण झाले एनसीबीचे अधिकारी

राज्यपालांना वेळ भेटेना, मात्र ‘त्या’ शेतकरी पुत्रांचे गाऱ्हाणे ऐकले शरद पवारांनी…