“2014 च्या निवडणुकीत थापा मारून सत्ता मिळवली तो नेता नाही तर अभिनेता निघाला”

मुंबई | काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पुन्हा एकदा पंतप्रधान नरेंद्र मोदींवर निशााणा साधला आहे. ‘चले जाव’चा आवाज उठला ती भूमी आहे, याच भूमितून ‘स्वराज्य हा माझा जन्मसिद्ध हक्क आहे आणि तो मी मिळवणारच’ हा आवाज उठला होता, असं अखिल भारतीय काँग्रेस कमिटीचे सरचिटणीस मुकुल वासनिक यांनी सांगितलं.

2014 च्या निवडणुकीत थापा मारून ज्यांनी सत्ता मिळवली तो नेता नाही तर अभिनेता निघाला, नायक नाही तर खलनायक निघाला, अशी टीका मुकुल वासनिक यांनी केली आहे.

स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवी वर्षाचे औचित्य साधत देशाच्या जडणघडणीत पंडित नेहरू यांचे योगदान तरुण पिढीला माहिती व्हावे याउद्देशाने प्रा. पुरुषोत्तम अगरवाल यांचे ‘नेहरु: कल आज और कल’ हे व्याख्यान टिळक भवन येथे आयोजित करण्यात आले होते, यावेळी ते बोलत होते.

यावेळी बोलताना प्रदेशाध्यक्ष नाना पटोले म्हणाले की भारतमाता कोण आहे? हे ज्यांना माहीत नाही तेच लोक ‘भारत माता की जय’ म्हणत त्याच भारतमातेला विकत आहेत, अशी टीका पटोलेंनी भाजपवर केली.

अगरवाल यांनी पंडित नेहरु यांच्या विचाराचा आणि भारताच्या जडणघडणीत त्यांचे योगदान किती मोलाचे आहे हे अत्यंत साध्या व सोप्या भाषेत पटवून दिले. असे कार्यक्रम राज्यभर राबवून नवीन पिढीली पंडित नेहरु यांच्याबद्दलची माहिती व्हावी, यासाठी राबविले जातील. असे कार्यक्रम राबवले तर नेहरु यांच्याबद्दल जो अपप्रचार सुरु आहे, तो खोटा असून वस्तुस्थिती समजेल, असंही नाना पटोले म्हणाले.

महत्वाच्या बातम्या-

आम्हाला तिघांना ग्रहण लागलं होतं, अजित पवारांनी विश्वास ठेवला, नाहीतर…- धनंजय मुंडे

पुणेकरांसाठी आनंदाची बातमी; महानगरपालिकेने घेतला ‘हा’ महत्त्वाचा निर्णय

“माजी पोलीस आयुक्त आणि माजी गृहमंत्री यांना मस्ती आली आहे, त्यांचे कुठं हनिमून सुरू आहे?”

“मुख्यमंत्रिपद हडपण्यासाठी उद्धव ठाकरेंनी बाळासाहेब ठाकरे यांच्या हिंदुत्वाला तिलांजली दिली”

“गाव जेवण एक दिवस देणार की पुढची तीन वर्ष देणार”