मुंबई | आजकाल इंटरनेट थोड्या वेळासाठी जरी बंद पडलं तरी अनेक कामं रखडतात. इंटरनेट कनेक्शन असलं तरी फास्ट इंटरनेटची आवश्यकता देखील तेवढीच आहे.
देशात 4G इंटरनेटमुळे चित्र बदललं. 4G मुळे घरबसल्या अनेक कामे होऊ लागली. त्यामुळे वेगवेगळ्या भागात अनेक वेगळे बदल पाहायला मिळाले.
4G इंटरनेट सेवेनंतर आता 5G कधी सुरू होणार, याकडे सर्वांचं लक्ष लागलं होतं. 5Gची आतुरतेने वाट पाहणाऱ्यांना आता आनंदाची बातमी मिळाली आहे.
नवीन वर्षात लोकांना 5G इंटरनेट सेवेचा आनंद घेता येणार आहे. मार्च-एप्रिल 2022 मध्ये 5G साठी स्पेक्ट्रम लिलाव आयोजित करण्याचा सरकारचा विचार आहे.
मुंबई, पुणे, दिल्ली, गुरूग्राम, हैदराबाद, बंगळुरू, कोलकाता आणि अहमदाबाद या मुख्य शहरात पुढच्या वर्षी 5G सेवा मिळवणारी देशातील पहिली शहरं ठरणार आहेत. दुरसंचार विभागाने यासंबंधिचं अधिकृत निवेदन जारी केलं आहे.
देशात गेल्या दोन वर्षापासून 5G टेस्टिंग सुरू आहे. जिओ, एअरटेल, वोडाफोन-आयडिया या टेलिकॉम कंपन्यांकडून वेगवेगळ्या शहरात 5G नेटवर्कचं टेस्टिंग सुरू आहे.
एका अभ्यासानुसार, 5G इंटरनेटचा वेग हा 4G पेक्षा दहा पटीने जास्त आहे. 5G इंटरनेट देशात नव्या डिजीटल क्रांतीची सुरूवात ठरू शकते. याचा थेट फायदा देशाच्या अर्थव्यवस्थेला होणार आहे.
5G मुळे वापरकर्त्यांना अधिक फास्ट इंटरनेट स्पीड, कमी लेटेंसी व अधिक फ्लेक्सिबिलिटी पाहायला मिळेल. शिवाय 5G क्लायंटला थेट क्लाऊडशी कनेक्ट करेल.
संपूर्ण देश आता 5Gच्या कमर्शियल लाँचिंगची वाट पाहात आहे. यासंबंधी कोणतीही अधिकृत घोषणा अद्याप झाली नसली तरी लोकांना लवकरच 5G इंटरनेटसेवेचा उपभोग घेता येईल.
महत्वाच्या बातम्या-
सलमानच्या वाढदिवसाला जेनेलियाचा भन्नाट डान्स; व्हिडीओ तुफान व्हायरल
महाराष्ट्रात पुन्हा लॉकडाऊन लागणार?; अजित पवारांनी स्पष्ट सांगितलं
टेन्शन वाढलं! गेल्या 24 तासात कोरोना रूग्णसंख्येत झपाट्यानं वाढ
हातातोंडाशी आलेला घास गारपिटीनं गेला! राज्यातील ‘या’ भागांना मोठा फटका
अंडी खाल्ल्यानं डायबिटीज होतोय का?; संशोधनातून धक्कादायक माहिती समोर