Top news मनोरंजन

धक्कादायक! मुंबईत आणखी एका अभिनेत्याची गळफा.स घेऊन आत्मह.त्या

मुंबई | अभिनेता सुशांत सिंह राजपूतच्या मृ.त्यूनंतर चित्रपट सृष्टीला जणू ग्रह.णच लागलं आहे. सुशांतच्या मृ.त्यूची घटना ताजी असतानाच आता चित्रपट सृष्टीतून आणखी एका दुःखद घटना समोर आली आहे. मुंबईमध्ये एका स्ट्रगलर अभिनेत्यानं बेरोजगारीमुळे आपल्या राहत्या घरी गळफा.स घेऊन आ.त्मह.त्या केली आहे.

अक्षत उत्कर्ष नावाचा 26 वर्षाचा तरुण चित्रपट सृष्टीत नाव कमवण्यासाठी मुंबईत आला होता. अक्षत इंडस्ट्रीमध्ये स्ट्रगलर अभिनेता म्हणून मिळेल ते काम करत होता. अंधेरी पश्चिम येथे अक्षत त्याची रूममेट स्नेहा सोबत एका फ्लॅटमध्ये राहत होता.

रविवारी रात्री साडेअकराच्या सुमारास स्नेहाला अचानक जाग आली होती. त्यावेळी स्नेहाला अक्षतचा मृ.तदेह फा.सावर आटकलेला आढळला. यानंतर स्नेहानं तातडीनं शेजाऱ्यांना आणि पोलीस नियंत्रण कशाला कळवलं.

मुंबई पोलिसांनी तातडीनं घटनास्थळी धाव घेत मृ.तदेह ताब्यात घेतला. यानंतर पोलिसांनी अक्षतचा मृ.तदेह कुपूर रुग्णालयात श.ववि.च्छेदनासाठी पाठवला. पोस्टमॉ.र्टम रिपोर्टमध्ये कोणतीही संशयित बाब आढळली नाही. यामुळे अक्षतने आ.त्मह.त्या केल्याचं स्पष्ट झालं आहे.

माहितीनुसार, कोरोनाच्या पार्श्वभूमीवर लागू करण्यात आलेल्या लॉकडाऊनमुळे अक्षतला कोणतंही काम मिळत नव्हतं. लॉकडाऊनमुळे अक्षतनं बऱ्याच मित्रांकडून पैसे उधार घेतले होते. मात्र, काम नसल्यानं तो पैसे परत करू शकला नाही.

लॉकडाऊनच्या काळात बेरोजगारीच्या समस्येला अक्षत तोंड देत होता. चित्रपट सृष्टीत जी काही थोडी कामे मिळत होती ती सुद्धा मिळनं बंद झालं होतं. बेरोजगारी आणि कर्जाला कंटाळून अक्षतनं आ.त्मह.त्या केल्याचं पोलिसांच्या प्राथमिक तपासात समोर आलं आहे.

अक्षत उत्कर्षच्या कुटुंबियांनी अक्षतची ह.त्या झाल्याचा संशय व्यक्त केला आहे. अक्षतच्या मृ.त्यूप्रकारणी पोलिसांनी त्याच्या ह.त्येच्या अनुषंगाने तपास करावा, अशी मागणी अक्षतच्या कुटुंबानं केली आहे. मुंबई पोलीस याप्रकरणी आणखी तपास करत आहेत.

दरम्यान, लॉकडाऊनच्या काळात कित्येक लोकांच्या हाताला काम नव्हतं. चित्रिकरणाची कामेही बरेच दिवस थांबली होती. यामुळे कित्येक अभिनेत्यांनी सरकारकडे चित्रिकरणाला परवानगी देण्याची मागणी केली होती. यानंतर सरकारनं आता नियमांमध्ये शिथिलता देत चित्रकारणास परवानगी दिली आहे. मात्र, मोठ मोठ्या कलाकारांना चित्रिकरणाच्या वेळी कोरोनाची लागण झाली आहे. काही कलाकारांनी कोरोनामुळे आपले प्राणही गमावले आहेत. यामुळे पुन्हा सोशल मीडियावर चित्रिकरणाची परवानगी रद्द करावी अशी मागणी केली जात आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

अनुराग कश्यपला अट.क होणार? तब्बल 8 तास चौकशी करत पोलिसांनी अनुरागला…

सुशांत केसमध्ये खरंच अरबाज खानला अटक केलंय का?, जाणून घ्या काय आहे सत्य

ड्र.ग्ज काय आहे?, अभिषेक बच्चनच्या उत्तराने चाहते झाले हैराण

“सुशांतच्या मृ.त्युच्या आदल्या दिवशी रिया सुशांतला भेटली होती!”

रियाचा 10 वर्षे तुरुं.गवास अटळ? रियाच्या घरी एनसीबीला सापडली ‘ही’ धक्कादायक गोष्ट!