तुम्ही इंजेक्शन मारलेल्या कोंबड्यांचं चिकन तर खात नाहीत ना???

मुंबई, 26 जून 2018 : मांसाहार करायला आवडत असेल आणि त्यातही चिकन म्हटलं की तोंडाला पाणी सुटत असेल, तर ही बातमी तुमच्या तोडचं पाणी पळवू शकते. कोंबड्यांचं वजन वाढवण्यासाठी त्यांना चक्क अॅन्टीबायोटिक्स इंजेक्शन दिलं जात असल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आलाय. याप्रकरणी मुंबई उच्च न्यायालयाने राज्य सरकारची चांगलीच कानउघाडणी केली आहे.

एका जनहित याचिकेच्या माध्यमातून ही बाब उघडकीस आली आहे. पोल्ट्री व्यावसायिक कोंबड्यांचं वजन वाढवण्यासाठी त्यांना अॅन्टीबायोटिक्स इंजेक्शन देत असल्याचं या याचिकेत म्हटलंय. सध्या अशा प्रकारच्या औषधांची डॉक्टरच्या प्रिस्क्रिप्शनशिवाय सर्रास विक्री होत आहे, असा दावाही या याचिकेत करण्यात आला आहे. 

चिकन घेताना ते वजनावर घेतलं जातं. वजन जास्त व्हावं आणि फायदा व्हावा हा यापाठीमागचा उद्देश आहे. मात्र अशाप्रकारे इंजेक्शन मारलेल्या कोंबड्यांचं चिक खाल्ल्यास त्याचा मानवी आरोग्यावर विपरित परिणाम होतो.

न्यायालयाने याप्रकरणी सरकारला धारेवर धरलं. असे प्रकार रोखणं ही तुमची जबाबदारी नाही का? असा सवाल न्यायालयाने राज्य सरकारला विचारला आहे. 

दरम्यान, चिकनसह दूध, डाळी, तांदूळ यांच्या भेसळीवरुनही न्यायालयाने चिंता व्यक्त केली आहे. याप्रकरणी प्रतिज्ञापत्र सादर करण्याचे आदेश न्यायालयाने राज्य सरकारला दिले आहेत.

साभार- थोडक्यात