मुंबई | महाराष्ट्रात वाढत असलेला कोरोनाचा प्रसार अत्यंत धक्कादायक असून मुंबईसह पुण्यात कोरोनाचा झपाट्याने प्रसार सुरु आहे. राज्य सरकारने हा प्रसार रोखण्यासाठी कडक पावलं उचलण्यास सुरुवात केली आहे. याअंतर्गत कोरोनाचा वाढता प्रसार रोखण्यासाठी मुंबई पोलिसांनी शहरात 144 कलम लागू केलं आहे. जास्त नागरिक एकत्र येण्यावर यामुळे निर्बंध लागणार आहेत.
नागरिकांनी सरकारच्या नियमांचं पालन करावं, अशी सूचना पोलिसांनी केली आहे. राज्य सरकारने दिलेलेल्या निर्देशानुसारच हा निर्णय घेतला असल्याचं मुंबई पोलिसांनी स्पष्ट केलं आहे. शहराती वाढती गर्दी कमी करण्यासाठी तसेच कोरोनाचा वाढता संसर्ग कमी करण्यासाठी हा नियम करण्यात आला आहे. 30 सप्टेंबरपर्यंत हे कलम लागू राहणार असल्याचं पोलिसांनी स्पष्ट केलं आहे.
मुंबईत कोरोना रूग्णांची संख्या दिवसेंदिवस चांगलीच वाढत आहे. लॉकडाऊन उठवल्यानंतर मुंबईतील गर्दी सातत्याने वाढत आहे. त्यामुळे कोरोनाच्या संसर्गाचं प्रमाणही मुंबईत चांगलंच वाढत आहे. त्यामुळे गर्दी कमी कशी करता येईल याची प्रशासनाला चिंता आहे, त्यासाठी हे कलम लागू करण्यात आलं आहे.
नागरिकांना या नियमांचं पालन करावं लागणार-
-नागरिकांनी कारण नसताना घराबाहेर पडणं टाळावं
-नागरिकांनी अनावश्यक गर्दी करू नये
-घराबाहेर पडताना मास्कचा वापर करावा
-नागरिकांनी सोशल डिस्टन्सिंगचं काटेकोर पालन करावं
मुंबईसारखेच नियम आता पुण्यातही लागू होणार-
कोरोनाचा वाढता प्रभाव रोखण्यासाठी आता मुंबईप्रमाणेत पुण्यातही उपाययोजना करण्यात येणार आहेत. पुणे महापालिका यावर लवकरच निर्णय घेणाक असल्याचं कळतंय. १८ सप्टेंबरपासून याची अंमलबजावणी देखील सुरु होणार आहे. महापालिकेनं आखून दिलेल्या नियमांचं पालन केलं नाही तर दंडाची देखील तरतूद केली जाणार आहे.
पुण्यात दोन पेक्षा अधिक नागरिकांना एकत्र उभं राहता येणार नाही. आदेशात नमूद केलेल्या कारणांशिवाय इतर कुणालाही घराबाहेर उभं राहता येणार नाही. तसेच रस्त्यावर फिरण्यासंदर्भातही यामध्ये तरतूद असणार आहे. मास्कचा वापर करणं हे सर्वात महत्त्वाचं असणार आहे, शिवाय सोशल डिस्टंसिंगलाही महत्त्वं देण्यात आलं आहे.
अनेक दुकानदार आपल्या ग्राहकांच्या सोशल डिस्टन्सिंगकडे लक्ष देत नाहीत. पालिका त्यांनाही दणका देणार आहे. नियमांचं पालन न करणाऱ्या दुकानदारांविरुद्धही महापालिकेने कारवाईला सुरूवात केली आहे. अशा प्रकारच्या 5 दुकानदारांविरुद्ध महापालिकेने कारवाई देखील केली आहे.
समहत्त्वाच्या बातम्या-
रिया चक्रवर्ती ‘या’ देशांतून सुशांतसाठी ड्र.ग्ज मागवत होती
रियानं मला ‘या’ कारणामुळं जबरदस्ती सुशांतची मॅनेजर बनवलं होतं; श्रुती मोदीचा धक्कादायक खुलासा
पूजा भट्टनं सांगितलं ड्र.ग्ज घेण्यामागचं कारण, सोशल मीडियावर झाली प्रचंड ट्रोल
सुशांत आणि साराच्या नात्यावर कंगनानं केला धक्कादायक खुलासा! करीना कपूरचं नाव घेत म्हणाली…
सिद्धार्थ पिठानीनं दिली धक्कादायक माहिती, दिशा सॅलियनच्या मृ.त्यूची बातमी ऐकून सुशांत…