मुंबईत ईडीची मोठी कारवाई! कुख्यात गुंड दाऊदच्या संबंधितांवर छापेमारी

मुंबई | सक्तवसुली संचनालय म्हणजेच ईडीनं गेल्या काही दिवसांपासून अनेक मोठ्या कारवाया केल्या आहेत. अशातच आता ईडीकडून मुंबईत मोठी कारवाई करण्यात आली आहे.

कुख्यात गुंड आणि माफिया दाऊद इब्राहिमच्या संबंधित ठिकाणांवर ईडीनं छापेमारी केली आहे. परिणामी आज मुंबईत तणावाचं वातावरण आहे. ईडीनं अनेक कार्यालयावर छापेमारी केली आहे.

दाऊद इब्राहिम म्हणजेच देशाच्या आर्थिक राजधानीचा काळा इतिहास आहे. पण तो इतिहास आज देखील मुंबईचा पाठलाग सोडताना दिसत नाही. परिणामी दाऊदवरून आता राज्याचं राजकारण तापण्याची शक्यता आहे.

महाविकास आघाडीतील एका महत्त्वाच्या मंत्र्यांचा देखील या कारवाईत समावेश असल्याची चर्चा सध्या चालू आहे. मात्र ईडीकडून अद्याप कसलीही अधिकृत माहिती सांगण्यात आली नाही.

दाऊद परदेशात बसून मुंबई आणि अन्य काही भागात आपले आर्थिक व्यवहार करत असल्याचं बोललं जातं. परिणामी ईडीनं आता त्याच्याशी संबंधितांवर कारवाई करण्यास सुरूवात केली आहे.

फेब्रुवारी महिन्याच्या सुरूवातीलाच युएईतून दाऊदचा सहकारी अबू बकारला अटक करण्यात आली आहे. अबू बकार हा दाऊदच्या अनेक घटनांचा साथीदार आहे. परिणामी त्याच्याकडून माहिती मिळवण्याचा प्रयत्न भारतीय तपास यंत्रणा करत आहेत.

दाऊद रिमोट कंट्रोलच्या सहाय्यानं परदेशात बसून भारतात गुन्हेगारी वाढवण्याच काम करतो. दाऊदनं मुंबईत अनेक भयानक गुन्हे केले आहेत. परिणामी मुंबईचा काळा इतिहास म्हणून देखील दाऊदचा उल्लेख करण्यात येतो.

दरम्यान, शिवेसेना नेते संजय राऊत यांची ईडी प्रकरणावरून बहूचर्चित पत्रकार परिषद आज होणार असताना आता ईडीनं हे दाऊद प्रकरण पुढे आणल्यानं विविध चर्चांना उधाण आलं आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

 ‘या’ कंपनीच्या शेअर्सने अवघ्या 10 महिन्यांत गुंतवणुकदारांना केलं मालामाल, 1 लाखाचे झाले 66 लाख

‘विश्वासात आणि श्वासात तू आहेस….’; अमृता फडणवीसांनी केली नव्या गाण्याची घोषणा

केंद्र सरकारने केला पीएफमध्ये ‘हा’ महत्त्वाचा बदल; लाखो लोकांना होणार फायदा

“…तर मला उदयनराजेंच्या ड्रायव्हरलाच I Love You म्हणावं लागेल”

“…म्हणून अण्णा हजारेंनी वाईन विक्रीला विरोध केलाय”