अनिल देशमुखांना दिलासा नाहीच, मुंबई उच्च न्यायालयाचा देशमुखांना आणखी एक दणका

मुंबई | राष्ट्रवादीचे नेते व महाराष्ट्राचे माजी गृहमंत्री अनिल देशमुख यांना मुंबई उच्च न्यायालयाने आणखी एकदा झटका दिला आहे. मनी लाँड्रिंग प्रकरणी अनिल देशमुखांना दिलासा मिळत नसल्याचं चित्र दिसत आहे.

अनिल देशमुखांना आणखी एक दणका देत भ्रष्टाचार प्रकरणी जामीन देण्यास मुंबई उच्च न्यायालयाने नकार दिला आहे. त्यामुळे अटकेत असलेले अनिल देशमुख यांच्या अडचणीत दिवसेंदिवस वाढ होताना दिसत आहे.

मुंबईचे माजी पोलिस आयुक्त परमबीर सिंह यांनी तत्कालिन मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांना पत्र लिहित अनिल देशमुखांवर पदाचा गैपवापर केल्याचे आरोप केले होते. तसेच परमबीर सिंह यांनी लेटरबॉम्ब टाकत देशमुखांवर 100 कोटींच्या वसुलीचे आरोप देखील केले होते.

बडतर्फ पोलीस आयुक्त सचिन वाझे व इतरांना मुंबईतील बारमधून 100 कोटींच्या वसूलीचे टार्गेट दिल्याचा दावा देखील परमबीर सिंह यांनी त्या पत्रातून केला होता. यानंतर सक्तवसूली संचालनालयाने अनिल देशमुखांना ताब्यात घेतलं.

नोव्हेंबर 2021 पासून अनिल देशमुख अटकेत आहेत. अटकेच्या सहा महिन्यांनंतरही अनिल देशमुख तुरूंगात असल्याने त्यांच्या अडचणी वाढल्या आहेत.

परमबीर सिंह यांच्या लेटरबॉम्बनंतर राज्यात चांगलीच खळबळ उडाली. यानंतर ईडीने या प्रकरणाची चौकशी करत अखेर अनिल देशमुखांना ताब्यात घेतलं.

दरम्यान, अनिल देशमुख अटकेपासून आर्थर रोड तुरूंगातच आहेत. तर देशमुखांच्या अडचणीत भर टाकत सीबीआयने देखील काही दिवसांपूर्वी देशमुखांच्या विरोधात न्यायालयात 59 पानी आरोपपत्र दाखल केलं होतं. त्यात देशमुखांना आणखी एक झटका देत मुंबई उच्च न्यायालयाने देशमुखांचा जामीन अर्ज फेटाळला आहे.

महत्त्वाच्या बातम्या-

‘आपल्यामुळे शिवसेनेला बळ मिळाले’, उद्धव ठाकरेंचं शिवसेना आमदारांना भावनिक पत्र

आबाबा! रणवीर-दीपिकाने खरेदी केलं तब्बल ‘इतक्या’ कोटींचं घर, किंमत ऐकून थक्क व्हाल

काळजी घ्या! मुसळधार पाऊस कोसळणार, ‘या’ भागात रेड अलर्ट जारी

‘नामांतराचा निर्णय उद्धव ठाकरेंचा, आमच्या पक्षाला कोणतीही विचारणा…’, शरद पवारांचा खुलासा

शिंदे सरकारची आज मोठी परिक्षा, बंडखोर आमदारांविरोधात सर्वोच्च न्यायालय काय निर्णय घेणार?