मुंबई | मुंबई उच्च न्यायालयाने राष्ट्रवादीचे नेते आणि मंत्री नवाब मलिक यांना जोरदार दणका दिला आहे. एनसीबीचे विभागीय संचालक समीर वानखेडे यांच्या कुटुंबीयां संदर्भात वक्तव्य किंवा आरोप करण्यास बंदी घातली आहे.
पुढील सुनावणीपर्यंत आठवडाभर फिर्यादी ज्ञानदेव वानखेडे आणि त्यांच्या कुटुंबातील सदस्यांविरुद्ध कोणतेही ट्विट किंवा सार्वजनिक वक्तव्यं केली जाणार नाहीत, मग ती प्रत्यक्ष किंवा अप्रत्यक्षपणे कोणत्याही प्रसिद्धी माध्यमातून असोत, असं मुंबई उच्च न्यायालयाने सांगितलं आहे.
वानखेडे कुटुंबाबद्दल सोशल मीडियावर काहीही पोस्ट करणार नाही, अशी हमी नवाब मलिक यांनी वकिलांच्या माध्यमातून मुंबई उच्च न्यायालयाला दिली आहे.
एकलपीठाच्या निर्णयाला वानखेडेंकडून खंडपीठापुढे आव्हान देण्यात आलं होतं. आता या प्रकरणी 9 डिसेंबरला हायकोर्टात पुढील सुनावणी आहे.
मलिक यांनी याबाबत कुठेही तक्रार का केली नाही?, केवळ ट्विट करून सिद्ध करण्याचा प्रयत्न करत आहात? का हे सारं निव्वळ प्रसिद्धीपोटी? की मीडिया ट्रायलसाठी? अशा सवालांची सरबत्ती न्यायमूर्ती एस. काथावालांकडून मलिकांच्या वकिलांवर यावेळी करण्यात आली.
आज सकाळी आणखी एक फर्जिवाडा, अंत्य संस्कारासाठी मुस्लिम आणि सरकारी कागदपत्रांसाठी हिंदू? धन्य दाऊद ज्ञानदेव” असं ट्वीट करत काही कागदपत्रं शेअर करत काही आरोप केले होते.
महापालिकेच्या मृत्यू नोंदणीमध्ये समीर वानखेडे यांच्या मातोश्री झाएदा ज्ञानदेव वानखेडे यांची मुस्लिम अशी नोंद आहे. तर मृत्यू अहवालात त्यांची हिंदू अशी नोंद असल्याची दोन कागदपत्रं नवाब मलिक यांनी शेअर केली आहेत.
दरम्यान, समीर वानखेडे आणि त्यांचे वडील ज्ञानदेव वानखेडे यांच्या जात प्रमाणपत्रावर नवाब मलिक यांनी संशय व्यक्त केला होता. या प्रकरणी ज्ञानदेव वानखेडे यांनी बॉम्बे हायकोर्टात धाव घेत अब्रू नुकसानीचा दावा दाखल केला होता.
प्रसारमाध्यम, सोशल मीडियामध्ये आपल्या कुटुंबियांबद्दल प्रसारित होणाऱ्या वृत्तांवर बंदी यावी, यासाठी त्यांनी मुंबई उच्च न्यायालयात दाद मागितली. नवाब मलिक यांच्याविरोधात त्यांनी सव्वा कोटी रुपयांचा अब्रूनुकसानीचा दावाही दाखल केला होता.
महत्त्वाच्या बातम्या-
गुणरत्न सदावर्तेंची शरद पवारांवर बोचरी टीका, म्हणाले…
“महाराष्ट्राच्या प्रमुख नेत्यांबद्दल एकेरी उल्लेख करता तुमचं कर्तृत्व काय”
‘या’ महिन्यात कोरोनाची तिसरी येण्याची दाट शक्यता- राजेश टोपे
एसटीच्या इतिहासातील सर्वात मोठी पगारवाढ; अनिल परबांची मोठी घोषणा
एकनाथ शिंदे की अजित पवार?, महाराष्ट्रात मुख्यमंत्रिपदाची जबाबदारी कुणाकडे जाणार???