मुंबई | मुंबईतील एका आयपीएस अधिकाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे. ड्रायव्हरमुळे आयपीएस अधिकाऱ्याला कोरोना झाल्याची माहिती आहे. मुंबईसह राज्यभरात 457 पोलिसांना कोरोनाची लागण झाली आहे.
IPS अधिकाऱ्याचा ड्रायव्हर काही दिवसांपूर्वी कोरोना पॉझिटिव्ह आला होता. मात्र, या अधिकाऱ्यास कोणतीही कोरोनाची लक्षणे नव्हती. पण त्यांनी कोरोनाची चाचणी केली असता ती पॉझिटिव्ह आली. यानंतर आता या अधिकाऱ्यास होम क्वारंटाईन करण्यात आलं आहे.
कोरोना संकटाशी मुकाबला करताना अनेक पोलीस अधिकारी आणि पोलीस कर्मचारी हे कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहेत. सध्या 40 पोलीस अधिकारी आणि 409 पोलीस कर्मचारी यांच्यावर उपचार सुरु आहेत.
दरम्यान, दुर्दैवाने राज्यातील 4 पोलिसांचा कोरोनाने मृत्यू झाला. यामध्ये मुंबईतील तीन आणि पुण्यातील एका पोलिसाचा समावेश आहे.
महत्वाच्या बातम्या-
-ड्युटीवर असुरक्षित वाटत असल्यानं IAS अधिकाऱ्याचा राजीनामा
-अंबानी कुटुंबाने खूप मदत केली, त्यांच्या मदतीशिवाय हा प्रवास पूर्ण झाला नसता- नीतू कपूर
-“इस्रायल कोरोना विरोधात लस निर्मितीपासून काही पावलं दूर”
-“नरेंद्र मोदी, अमित शहा आणि भक्तांकडे या प्रश्नाचं उत्तर आहे का?”
-‘तुम्ही महाराष्ट्राचे नागरिक असाल आणि परदेशात अडकला असाल तर…’; ठाकरे सरकारचं आवाहन