कोरोनाच्या संकटकाळात 30 हजार दिव्यांगांसाठी मुंबई महापालिकेचं मोठं पाऊल

मुंबई | कोरोनाच्या पार्श्वभूमीवर देशभरात लॉकडाऊन आहे. महाराष्ट्रसह काही राज्यांमध्ये हे लॉकडाऊन वाढवण्यातही आले आहे. लॉकडाऊनमुळे दिव्यांग व्यक्तींचे छोटे-छोटे रोजगार बंद आहेत. त्यामुळे अडचणीत सापडलेल्या दिव्यांगांना मदत मिळावी, यासाठी शिवसेना अपंग सहाय्य सेनेने मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांच्यासह महापौर किशोरी पेडणेकर यांच्याकडे पाठपुरावा केला होता. या पाठपुराव्याला यश आले असून मुंबई महानगरपालिकेकडून सुमारे 30 हजार दिव्यांगांना धान्य तसेच आर्थिक मदत दिली जाणार आहे.

कोरोनाच्या पार्श्वभूमीवर, महाराष्ट्रातील काही महानगरपालिकांनी काही ठिकाणी अन्नधान्य व आर्थिक मदत देण्यास सुरुवात केली आहे. मुंबईतील दिव्यांगांचे टेलिफोन तसेच झेरॉक्स यासारखे छोटे छोटे व्यवसाय बंद आहे. त्या पार्श्वभूमीवर, मुंबईतील दिव्यागांनाही धान्य तसेच आर्थिक मदत मिळावी, यासाठी शिवसेना अपंग सहाय्य सेनेने महापौर किशोरी पेडणेकर व पालिका आयुक्त यांच्याकडे पाठपुरावा केला होता.

त्या पार्श्वभूमीवर मुंबईत राहणार्‍या दिव्यांगाना धान्य व आर्थिक मदत करण्याचे निर्देश नियोजन विभागाच्या डीएमसी डॉ. संगीता हसनाळे यांना देण्यात आले आहे. मुंबईत राहणार्‍या दिव्यांगाना या योजनेचा लाभ घ्यायचा असेल त्यांनी एलफिन्स्टन (प्रभादेवी) येथिल नियोजन विभागाशी संपर्क साधून आवश्यक त्या कागदपत्रांची पूर्तता करावी, असे आवाहन अध्यक्ष सूर्यकांत लाडे यांनी केले आहे.

राज्य सरकार आणि पालिकेकडे पाठपुरावा करण्यासाठी राष्ट्रीय अपंग विकास महासंघ संस्थापक -अध्यक्ष मंगेश मालोंडकर, भारतीय अंध अपंग पुनर्वसन संस्था- अध्यक्ष सुरेंद्र लाड, सिद्धिविनायक अंध अपंग संस्था सरचिटणीस सुभाष कदम, चेतन पुरोहित, कमल शेडेकर, आनंद तरळ, शेख आदी दिव्यांग संस्थाच्या पदाधिकार्याचे मोलाचे सहकार्य लाभले.

महत्वाच्या बातम्या-

धारावीत अवघ्या 15 दिवसांत कोविड रूग्णालय बांधून तयार, आरोग्यमंत्र्यांनी केली पाहणी

-मुख्यमंत्र्यांनी लॉकडाऊनमध्ये शिथीलता दिलीये पण….- संजय राऊत

-‘निसर्ग’ चक्रीवादळाला तोंड देण्यासाठी ठाकरे सरकार सज्ज, मुख्यमंत्र्यांनी सांगितला ‘प्लॅन’!

कौतुकास्पद… आरोग्यमंत्री राजेश टोपेंनी राज्याच्या जनतेला दिल्या 2 मोठ्या गुडन्यूज

-‘हरिओम’ ऐवजी ‘हे राम’ म्हणावे लागेल अशी वेळ लोकांनी आणू नये- संजय राऊत