महाराष्ट्र मुंबई

कुणी 5 कोटी दिलेत, कुणी 500 कोटी… आम्ही आमचं आयुष्य देतोय; मुंबई पोलिसांचं भावूक ट्विट

मुंबई |   कोरोनायुद्धात जीवाची बाजू लावून प्राणपणाने महाराष्ट्र पोलिस तसंच देशातील पोलिस लढत आहेत. मात्र पोलीस दलातील अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनाही कोरोनाची मोठ्या प्रमाणावर बाधा होत आहे. मुंबईतल्या धारावीत पोलिस स्थानकाचे सहाय्यक पोलीस निरीक्षक अमोल कुलकर्णी आणि एका 57 वर्षीय सहाय्यक उपनिरीक्षकाचा कोरोनामुळे मृत्यू झाला आहे. यानंतर मुंबई पोलिसांनी एक भावूक ट्विट केलं आहे.

कुणी 5 कोटी दिलेत तर कोणी 500 कोटी दिलेत, आम्ही आमचं आयुष्य देतोय… अशी ओळ लिहित मुंबई पोलिसांनी अमोल कुलकर्णी यांचा एक जुना फोटो ट्विटरवर पोस्ट केला आहे. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये अमोल कुलकर्णी या सहाय्यक पोलीस निरीक्षकाच्या निधनानंतर त्यांच्या प्रोफाइलवर त्यांनीच पोस्ट केलेला हा जुना फोटो पोलिसांनी ट्विटरवरुन शेअर केलाय.

खऱ्या पोलीस कर्मचारी ‘स्वत:पेक्षा कर्तव्य महत्वाचे या ध्येयानेच जीवन जगतात. करोनाविरुद्धच्या लढाईमध्ये सर्वोच्च बलिदान देणारे दिवंगत एपीआय अमोल कुलकर्णी यांच्या खासगी प्रोफाइलवरील ही पोस्ट… अमोल कुलकर्णी यांच्या आत्म्याला शांती मिळो, अशी प्रार्थना मुंबई पोलिसांनी केली आहे.

दुसरीकडे करोनाचा संसर्ग झालेल्या राज्यातील पोलीस कर्मचाऱ्यांची संख्या कालपर्यंत 1140 वर पोहचली आहे. या पैकी 949 कर्मचारी हे पोलीस हवालदार असल्याची माहिती समोर आली आहे.

 

महत्वाच्या बातम्या-

-“खडसेंना बाजूला करण्यात यांचा डाव; राज्यातील भाजप नेत्यांमध्ये तेवढी ताकद आणि हिम्मत नाही”

-अहो, त्याचा 1 वर्षाचा मुलगा गेलाय हो… ढसढसा रडणारच की!

-“मुंबईच्या आर्थिक नाड्या अजूनही परप्रांतीय हातात, शेठ मंडळींची जागा घेतली पाहिजे”

-माझा राजकीय वारसदार हा माझा कार्यकर्ता असेल, घरातील कुणी नाही- नितीन गडकरी

-पुण्यात दिवसेंदिवस वाढती रूग्णसंख्या; महापौरांनी केली अजित पवारांकडे ‘ही’ महत्त्वाची मागणी