‘या’ कारणामुळे अभिनेत्री पूनम पांडेला घराबाहेर जाणं महागात पडलं

मुंबई |  सध्या देशव्यापी सुरू असल्याने नागरिकांना विनाकारण घराबाहेर पडण्यास मज्जाव करण्यात आला आहे. असचं विनाकारण घराबाहेर पडणं अभिनेत्री पूनम पांडेला महागात पडलं आहे. पूनम पांडेला मुंबई पोलिसांच्या कारवाईला सामोरे जावं लागलं आहे.

लॉकडाऊनचं उल्लंघन करुन पूनम पांडे बीएमडब्ल्यू कारमधून मरिन ड्राईव्ह परिसरात फेरफटका मारत होती. मरिन ड्राईव्ह परिसरातील सीसीटीव्ही कॅमेऱ्यांमध्ये पूनमची कार दिसताच पोलिसांनी कारवाई केली आहे.

मुंबई पोलिसांनी पूनम पांडेविरोधात गुन्हा तर दाखल केला आहे तसंच तिची कार देखील जप्त केली आहे. पूनमविरोधात आयपीसी कलम 269, 188 आणि राष्ट्रीय आपत्ती व्यवस्थापन कायद्यांतर्गत मरिन ड्राईव्ह पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्यात आला.

दरम्यान, गुन्हा दाखल केल्यानंतर पोलिसांनी पूनम आणि तिचा मित्र सॅम अहमद या दोघांना चौकशीसाठी ताब्यात घेतले. पोलिस याप्रकरणी अधिक तपास करत आहे.

महत्वाच्या बातम्या-

-मुख्यमंत्र्यांचा विधान परिषदेचा अर्ज दाखल; ठाकरे कुटुंबाची विधान भवनात हजेरी

-“कॉंग्रेसने सचिन सावंत यांच्यासारख्या आक्रमक, अभ्यासू पदाधिकाऱ्याला संधी द्यायला हवी होती”

-‘माघारी’पेक्षा महाराष्ट्राचे हित महत्त्वाचं होतं, काँग्रेसच्या भूमिकेचं सामनामधून कौतुक

-“कतरिना माझ्याकडे आली अन् मिठी मारुन मला म्हणाली…”

-धक्कादायक! उरणमध्ये एकाच कुटुंबातील 21 जणांना झाली कोरोनाची बाधा