नवनीत राणांच्या आरोपावर मुंबई पोलिसांचं प्रत्युत्तर; CCTV व्हिडीओ शेअर करत म्हणाले…

मुंबई | आमदार रवी राणा आणि खासदार नवनीत राणा यांनी मातोश्रीवर हनुमान चालिसा पठन करणार असल्याचा इशारा दिला होता. राणा दाम्पत्यांच्या इशाऱ्यानंतर मातोश्रीवर मोठा राडा झाल्याचं पहायला मिळालं होतं.

खार पोलिसांनी राणा दामप्त्यांना अटक केली. त्यानंतर दोघांना आता न्यायालयीन कोठडी सुनावण्यात आली आहे. त्यावेळी नवनीत राणा यांनी गंभीर आरोप केले होते.

कोठडीत पोलिसांकडून अपमानास्पद वागणूक मिळाली तसेच मागासवर्गीय असल्याने रात्रभर पाणी दिले गेले नाही, असा आरोप नवनीत राणा यांनी केला होता. त्याचबरोबर त्यांनी लोकसभेचे अध्यक्ष ओम बिर्ला यांना पत्र देखील लिहीलं होतं.

अशातच आता मुंबई पोलीस आयुक्त संजय पांडे यांनी नवनीत राणा यांनी एक CCTV व्हिडीओ शेअर करत नवनीत राणा यांच्या आरोपाला प्रत्युत्तर दिलं आहे.

पोलीस स्टेशनमध्ये चहा पितानाचा व्हिडीओ आयुक्तांनी ट्विटरवर शेअर केला आहे. यामुळे राणांकडून करण्यात येत असलेले सगळे आरोप मुंबई पोलीस आयुक्तांकडून खोडण्यात आले आहेत.

दरम्यान, मुंबई पोलीस आयुक्तांनी Do we say anything more असं कॅप्शन देत व्हिडिओ शेअर केला आहे. त्यामुळे आता नवनीत राणा यांचे आरोप खोटे ठरत असल्याचं या व्हिडीओमधून समोर येतंय.

पाहा व्हिडीओ-


महत्त्वाच्या बातम्या- 

चोरट्यांचा नाद खुळा! थेट बुलडोझरने फोडलं ATMचं मशीन; पाहा व्हिडीओ

भर मांडवात नवरा बायकोची हाणामारी; व्हिडीओ सोशल मीडियावर घालतोय धुमाकूळ 

‘….हे सुद्धा मुख्यमंत्र्याला कळत नाही’; निलेश राणेंची उद्धव ठाकरेंवर बोचरी टीका 

मोठी बातमी! राज ठाकरेंना झटका, सभेपूर्वी पोलिसांनी उचललं मोठं पाऊल 

“माझ्यावर टीका करणाऱ्या अनेकांना मी खिशात घेऊन फिरतो”