मुंबई : भायखळ्यातील राणीच्या बागेत लवकरच पाळणा हलणार आहे. पेंग्विनच्या 3 जोड्यापैकी एका जोडीने गुड न्यूज दिली आहे. 40 दिवसांनी राणीच्या बागेत पेंग्विनचा जन्म होणार आहे.
राणीच्या बागेत सर्वात कमी वयाचा असलेला पेंग्विन मॉल्ट ( 3 वर्षे ) आणि त्याची मादी फ्लिपर ( साडेचार वर्षे ) यांनी ही गुडन्यूज दिली आहे. फ्लिपरनं अंडं दिलं असून या अंड्यातून 40 दिवसांनी पेंग्विन बाहेर येईल.
राणीच्या बागेत जन्माला येणारा पेंग्विन मुंबईच नव्हे तर भारतात जन्माला येणारा पहिला पेंग्विन असणार आहे. मार्च ते एप्रिल आणि ऑक्टोबर ते नोव्हेंबर हा पेंग्विनचा प्रजननकाळ असतो
दरम्यान, युवासेना प्रमुख आदित्य ठाकरे यांच्या हट्टानंतर हे पेंग्विन मुंबईत आणण्यात आले होते. गेल्या दोन वर्षात हे पेंग्विन राणीच्या बागेत चांगलेच रुळले आहेत. त्यांना पाहण्यासाठी मोदी गर्दी होत असून त्यासाठीच्या तिकीटांमधून पालिकेला चांगला महसूल देखील मिळाला आहे.