Top news खेळ देश

मुंबई इंडियन्सच्या टीमसह समर्थकांना मोठा झटका! मुंबईची टीम प्ले ऑफमध्ये नाही?

नवी दिल्ली | 2020च्या आयपीएल मोसमात खेळाबरोबरच अनेक विक्रम क्रीडा रसिकांना पाहायला मिळाले. काही वेळा रोमांचक आणि थक्क करणारा खेळ तर काही वेळा नवनवे विक्रम असे दुहेरी रूप या आयपीएलमध्ये पाहायला मिळाले.

आयपीएल 2020 आता उत्तरार्धाकडे झुकत चालला आहे. आयपीएल मधील सर्वच संघ प्ले ऑफमध्ये आपलं स्थान निश्चित करण्यासाठी धडपड करत आहेत. मुंबई इंडियन्सचा संघ आयपीएलच्या या पर्वात सुरुवातीपासूनच उत्तम खेळीचं प्रदर्शन करत आहे.

बुधवारी मुंबई इंडियन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यामध्ये सामना खेळला गेला. मुंबईने या सामन्यात विजय मिळवून पॉईंट टेबलमध्ये प्रथम स्थान मिळवले आहे. आरसीबी विरुद्धच्या सामन्यात विजय मिळवल्यानंतर मुंबईच्या संघाला 16 गुण मिळाले आहेत. 16 गुणांसह मुंबईच्या संघाचं प्ले ऑफ मधील स्थान पक्क झालं आहे. मात्र, अद्याप आयपीएलकडून त्यावर शिक्कामोर्तब करण्यात आला नाही.

मुंबई इंडियन्सच्या संघाने आयपीएल 2020 मध्ये आत्तापर्यंत 12 सामने खेळले आहेत. यातील 8 सामन्यात मुंबईच्या संघाने विजय मिळवला आहे. 8 सामन्यातील विजयासह मुंबईच्या संघाने 16 गुण मिळवले आहेत. मात्र, जर आपण उर्वरित संघांच्या गुणांवर नजर टाकली तर आपल्या लक्षात येईल की, गुणपत्रिकेतील पाच संघ उर्वरित सामने खेळून सहज 16 गुणांपर्यंत मजल मारतील.

प्ले ऑफमध्ये फक्त चारच संघ पोहोचू शकतात. यामुळे आयपीएल मधील कोणते चार संघ प्ले ऑफसाठी क्वालिफाय होणार हे पाहणं आता महत्वाचं ठरणार आहे. यामुळे येते सर्व सामने मुंबई इंडियन्सच्या संघासाठी महत्वाचे ठरणार आहेत.

बुधवारी मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात अबू धाबी येथील क्रिकेट स्टेडीअममध्ये सामना खेळला गेला. मुंबई इंडिअन्सच्या संघाने या सामन्यात पाच गडी राखून बेंगलोरच्या संघावर विजय मिळवला आहे.

या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करत 164 धावा केल्या होत्या. बेंगलोरच्या संघाकडून खेळणाऱ्या देवदत्त पड्डीकलने यावेळी संघासाठी 74 धावांची उत्तम खेळी खेळली. मात्र, बेंगलोरच्या संघाला या सामन्यात विजय मिळू शकला नाही.

रॉयल चलेंजर्सनं दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाकडून सुर्यकुमार यादवने 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या आहेत.

महत्त्वाच्या बातम्या-

प्रेक्षकांना भुरळ घालणारी रेखाची ‘ती’ भूमिका आता श्रद्धा साकारतेय; वाचा सविस्तर

विराट कोहलीने मैदानातून अनुष्काला विचारला ‘तो’ प्रश्न; प्रेक्षक झाले हैराण!

कंगना राणावतला अट.क होणार? न्यायालयाने कंगना विरुद्ध पोलिसांना दिले महत्वाचा आदेश

‘बिहार प्रचारात मला धमकावत माझ्यावर बला.त्कार…’; ‘या’ अभिनेत्रीचा बड्या नेत्यावर धक्कादायक आरोप!

पंकजा मुंडेंच्या राष्ट्रवादी प्रवेशाबाबत शरद पवारांचा इशारा? पंकजा मुंडेंचं कौतुक करत पवार म्हणाले…