मुंबईच्या ‘या’ खेळाडूनं विराट कोहलीचा माज मोडला; पाहा व्हिडीओ

नवी दिल्ली | 2020च्या आयपीएल मोसमात खेळाबरोबरच अनेक विक्रम क्रीडा रसिकांना पाहायला मिळाले. काही वेळा रोमांचक आणि थक्क करणारा खेळ तर काही वेळा नवनवे विक्रम असे दुहेरी रूप या आयपीएलमध्ये पाहायला मिळाले. आयपीएलच्या या पर्वातील प्रत्येकच सामना रोमांचक पाहायला मिळत आहे.

बुधवारी असाच सामना मुंबई इंडिअन्स आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोर यांच्यात खेळला गेला. हा सामना अबू धाबी येथील क्रिकेट स्टेडीअममध्ये खेळला गेला. मुंबई इंडिअन्सच्या संघाने या सामन्यात पाच गडी राखून बेंगलोरच्या संघावर विजय मिळवला आहे.

या सामन्यात दोन्ही संघांमध्ये चांगलीच चुरस पाहायला मिळाली आहे. त्याबरोबरच या सामन्यात मुंबई इंडिअन्स संघाचा फलंदाज सुर्यकुमार यादव आणि रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरचा कर्णधार विराट कोहली यांच्यामध्ये खुन्नस पाहायला मिळाली आहे. मुंबईच्या संघाला या सामन्यात विजय मिळवून देण्यासाठी सुर्यकुमार यादवने मोलाचा वाटा उचलला आहे.

रॉयल चलेंजर्सनं दिलेल्या 165 धावांचा पाठलाग करताना मुंबईच्या संघाकडून सुर्यकुमार यादवने 43 चेंडूत 10 चौकार आणि 3 षटकारांसह नाबाद 79 धावा केल्या आहेत. यादरम्यान 13व्या ओव्हरमध्ये फलंदाजी करत असताना विराट कोहली आणि त्याच्यात खुन्नस पहायला मिळाली आहे.

गोलंदाज डेल स्टेन हा रॉयल चॅलेंजर्सकडून 13वी ओव्हर टाकत होता. या ओव्हरमध्ये पाचव्या चेंडूवर सुर्यकुमारने षटकार लगावला होता. तर या ओव्हरमधील सहावा चेंडू त्याने कव्हरच्या दिशेने खेळला. यावेळी विराट कोहली तिथे क्षेत्ररक्षण करत होता. त्याने लगेच सुर्यकुमारने मारलेला चेंडू आडवला.

विराट कोहलीने चेंडू आडवल्यानंतर तो सुर्यकुमारच्या दिशेने चालत येवू लागला. यावेळी विराट कोहली सुर्यकुमार यादवकडे खुन्नसच्या नजरेने पाहताना दिसला. यावेळी सूर्यकुमारनेही विराटवरील नजर हटवली नाही. त्यानेही विराटवर नजर रोखून धरली.

याच्यानंतर विराट कोहली सुर्यकुमार यादवच्या बाजूला येवून उभा राहिला. मात्र, यानंतर सुर्यकुमारने त्याच्याकडे दुर्लक्ष केले आणि तो विराटपासून निघून गेला. सामन्यातील हा क्षण सध्या सोशल मीडियावर प्रचंड व्हायरल होत आहे.

दरम्यान, या सामन्यात रॉयल चॅलेंजर्स बेंगलोरने प्रथम फलंदाजी करत 164 धावा केल्या होत्या. बेंगलोरच्या संघाकडून खेळणाऱ्या देवदत्त पड्डीकलने यावेळी संघासाठी 74 धावांची उत्तम खेळी खेळली. मात्र, बेंगलोरच्या संघाला या सामन्यात विजय मिळू शकला नाही.

महत्त्वाच्या बातम्या-

राज्यपाल नियुक्त 12 आमदारांच्या नावांवरून महाराष्ट्र सरकारमध्ये चुरस; ‘ही’ नावं चर्चेत

उद्धव ठाकरेंच्या ‘त्या’ वक्तव्यावर पवारांचा घणाघात! महाविकास आघाडी सरकारसाठी धोक्याची घंटा?

बारमध्ये स्त्रियांना ‘नो शर्ट फ्री बियर’ ऑफर! मुंबईतील ‘या’ बारमधील धक्कादायक प्रकार

कोरोनानंतर भारतीयांमोर नविन संकट! वैज्ञानिकांनी दिला धक्कादायक इशारा

सुशांत प्रकरणाला धक्कादायक वळण! आता सुशांतच्या बहिणीच गजाआड जाणार?