देश

धक्कादायक! दुकानाबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घातला…

राजस्थानच्या अलवर जिल्ह्यात एक अत्यंत धक्कादायक घटना घडली आहे. या धक्कादायक घटनेचा व्हीडिओ देखील समोर आला आहे. पाहणाऱ्याच्या काळजाचा थरकाप उडवणारा हा व्हीडिओ आहे. 

अलवारमधील हा व्हीडिओ एक सीसीटीव्ही फुटेज आहे. एका व्यक्तीला डोक्यात दगड घालून मारण्याचा प्रयत्न करण्यात आला आहे. हे सीसीटीव्ही फुटेज पाहणाऱ्याच्या काळजाचं पाणी होईल, असा हा व्हीडिओ आहे.

काय आहे नेमकं या व्हीडिओत?

धक्कादायक घटनेचा हा व्हीडिओही तितकाच धक्कादायक आहे. व्हीडिओत दिसतंय की एक व्यक्ती दुकानाबाहेर झोपलेली आहे. हातात भलामोठा दगड घेतलेला एक व्यक्ती चालत येताना दिसतोय. हा दगड त्या व्यक्तीनं खांद्यावर घेतलेला आहे. हळूहळू पावलं टाकत तो व्यक्ती चालतो आहे. दुकानाबाहेर झोपलेल्या व्यक्तीच्या जवळ जाताना तो कोणताही आवाज होणार नाही याची दक्षता घेतो. दबक्या पावलानं झोपलेल्या व्यक्तीजवळ जातो आणि त्या व्यक्तीला काही कळण्याच्या आत त्याच्या डोक्यात दगड घालतो. दगड समोरच्याच्या डोक्यात पडतो न पडतो तोच तो धूम ठोकून पळून देखील जातो.

झोपलेल्या व्यक्तीचं काय झालं?

झोपलेल्या व्यक्तीच्या डोक्यात दगड घालून त्याची हत्या करण्याचा प्रयत्न झाला. मात्र या व्यक्तीचं नशीब बलवत्तर होतं. डोक्यात दगड पडूनही ही व्यक्ती वाचली आहे. तिच्यावर रुग्णालयात उपचार सुरू आहेत. पोलिसांनी हल्लेखोराला अटक केली आहे.

पाहा तो थरारक व्हीडिओ-