Pune Loksbha Election 2024 l सध्या लोकसभा निवडणुकीचे वारे सर्वत्र फिरात आहेत. येत्या लोकसभा निवडणुकीच्या पार्श्वभूमीवर संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष हे पुणे लोकसभेकडे लागले आहे. पुण्यात भाजप, महाविकास आघाडीचे पक्षप्रमुख बारकाईने लक्ष घालत आहेत. यापार्श्वभूमीवर पुणे लोकसभा मतदारसंघातून भाजपकडून कोणाला उमेदवारी मिळणार याकडे संपूर्ण महाराष्ट्राचं लक्ष लागलं आहे.
Pune Loksbha Election 2024 l पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता!
अशातच सध्या भाजप पक्षाकडून पुणे लोकसभेसाठी अनेक नावांची चर्चा रंगत आहेत. त्यामध्ये जगदीश मुळीक (Jagdish Mulik) आणि मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) या दोन नावांची तुफान चर्चा रंगत आहे. अशातच भाजपकडून राज्यातील लोकसभा मतदार संघाच्या उमेदवारांची संभाव्य यादी जाहीर करण्यात आली होती. यामध्ये पुणे लोकसभा मतदारसंघातून मुरलीधर मोहोळ यांना उमेदवारी मिळण्याची दाट शक्यता वर्तवण्यात आली आहे. पण मुरलीधर मोहोळ (Muralidhar Mohol) यांचं आणि पुणेकरांचा नातं काय आहे? त्यांची राजकीय पार्श्वभूमी काय आहे? याबाबतची माहिती जाणून घेऊयात…
Who is Muralidhar Mohol l मुरलीधर मोहोळ कोण आहेत?
– मुरलीधर मोहोळ हे पुणे महानगरपालिकेचे 2002, 2007, 2012 आणि 2017 असे चार वेळा सभासद म्हणून विजयी झाले आहे. (Who is Muralidhar Mohol)
– तसेच मुरलीधर मोहोळ हे 2019- 2022 मध्ये पुणे महानगरपालिकेचे महापौर होते.
– मुरलीधर मोहोळ हे 2017-2018 साली पुणे महानगरपालिकेचे स्थायी समिती अध्यक्ष होते.
– 2017-2018 साली पुणे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कॉर्पोरेशन लिमिटेड (पीएससीडीसीएल) चे संचालक होते.
– मुरलीधर मोहोळ यांनी 2017-2018 मध्ये पुणे महानगर परिवहन महामंडळ लिमिटेडचे संचालक म्हणून कार्य सांभाळले आहे. (Muralidhar Mohol)
– मोहोळ यांनी पुणे महानगर प्रदेश क्षेत्र विकास प्राधिकरण (पीएमआरडीए) 2017-2018 मध्ये सभासद पदाची धुरा सांभाळली आहे.
– 2009 मध्ये खडकवासला (पुणे) मतदारसंघातून निवडणुकीसाठी उमेदवार होते.
News Title : Mulrdlidhar Mohol Pune Loksbha Election 2024
महत्त्वाच्या बातम्या-
पुणेकरांसाठी आनंदाची बातमी! आज या वेळेत धावणार रुबी हॉल क्लिनिक ते रामवाडी मेट्रो
आजचे राशिभविष्य! या राशीच्या व्यक्तींनी तब्बेतीची काळजी घ्यावी
‘मी कोणालाही त्रास देत नाही, आधी त्यांनी…’; मनोज जरांगे पाटलांचा मोठा गौप्यस्फोट
“छात्या दुखल्या तरी पण…”; जरांगेंच्या वक्तव्याने एकच खळबळ
‘उद्या अंतरवाली सराटीमध्ये…’; मराठा आंदोलनाबाबत जरांगेंची सर्वात मोठी घोषणा!