“नाना पटोलेंनी राजीनामा द्यावा अन् येरवड्यात दाखल व्हावं”

मुंबई | काँग्रसचे प्रदेशाध्यक्ष नाना पटोले (Nana Patole) यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी (Narendra Modi) यांच्याविषयी केलेल्या वक्तव्याने वादंग निर्माण झालं आहे. याविरोधात भाजप चांगलीच आक्रमक झाली आहे. ठिकठिकाणी नाना पटोले यांच्याविरोधात तक्रारी दाखल करण्यात आल्या आहेत.

नाना पटोलेंच्या वक्तव्यावरून त्यांच्यावर भाजप नेत्यांकडून टीका केली जात आहे. आता काँग्रेसच्या प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि येरवडा रुग्णालयात दाखल व्हा, अशी खोचक टीका पुण्याचे महापौर मुरलीधर मोहोळ यांनी केली आहे.

महापौर मुरलीधर मोहोळ यांनी टीव्ही9 मराठीशी संवाद साधताना ही खोचक टीका केली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्षपदाचा राजीनामा द्या आणि पुण्यातल्या ‘येरवड्या’त दाखल व्हा, असं मोहोळ म्हणालेत.

तुमची बौद्धिक कुवत आणि मानसिक स्थिती पाहता, हेच योग्य आहे. नावापुरता का होईना, पण ‘राष्ट्रीय’ पक्षाच्या प्रदेशाध्यक्षाने पंतप्रधानांबद्दल काय बोलावं, याचं काडीचही भान असू नये?, असा संतापही मोहोळ यांनी व्यक्त केला आहे.

दरम्यान, पटोले यांनी केलेल्या वक्तव्यावर भाजपचे आमदार चंद्रशेखर बावनकुळे यांनीही आक्रमक भूमिका घेतली आहे. काँग्रेस प्रदेशाध्यक्ष नाना पटोले यांनी पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल आक्षेपार्ह वक्तव्य केलं आहे. त्यानंतर भारतीय जनता पक्षाने आक्रमक भूमिका घेतली आहे.

भाजप नेते चंद्रशेखर बावनकुळे यांच्या नेतृत्वात नागपूरच्या कोराडी पोलीस स्टेशनच्या आवारामध्ये आंदोलन करण्यात आले. जोपर्यंत नाना पटोले यांचावर गुन्हा दाखल केल्याची प्रत मिळत नाही, तोपर्यंत पोलिस स्टेशनमधून हलणार नाही असा इशारा भाजप कार्यकर्त्यांनी दिला आहे.

केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्यावर गुन्हा दाखल होऊ शकतो, तर नाना पटोलेंवर का नाही?, असा सवाल बावनकुळे यांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

“शरद पवार साहेबांनी मेट्रोतून चक्कर मारून आणा असा हट्ट केला का?” 

‘इतना झूठ तो टेलिप्रॉम्प्टर भी सह न सका’; राहुल गांधींचा मोदींना टोला 

नाना पटोलेंना अटक होणार?; ‘या’ केंद्रीय मंत्र्याचं मोठं वक्तव्य 

‘भारतात दिवसाला 7 लाखाहून अधिक रुग्ण सापडतील’; तज्ज्ञांनी दिली महत्वाची माहिती 

‘…तरच कोरोना टेस्ट करा’; तज्ज्ञांनी दिला महत्वाचा सल्ला