“माझ्या हत्येचे कटकारस्थान रचले जात आहे”

मुंबई | भाजप नेते किरीट सोमय्या आज दापोली दौऱ्यावर होते. या दौऱ्यात खूप काही पहायला मिळालं. त्यामुळे सध्या राज्यातील वातावरण तापलेलं आहे.

परिवहन मंत्री अनिल परब यांच्या कथित रिसाॅर्टवरुन किरीट सोमय्या आक्रमक झाले आहेत. त्यांनी अनिल परबांसोबत ठाकरे सरकारवही ताशेरे ओढले आहे.

किरीट सोमय्या आणि निलेश राणे काहीवेळापूर्वीच दापोली पोलीस ठाण्यात गेले होते. याठिकाणी त्यांना ताब्यात घेतले जाण्याची शक्यता होती. मात्र, पोलिसांनी या दोघांना तासभर बसवून पुन्हा बाहेर सोडलं.

पोलीस ठाण्यातून बाहेर आल्यावर किरीट सोमय्यांनी गंभीर आरोप केल्याचं पहायला मिळालं. त्यामुळे पुन्हा एकदा वातावरण गरम झालं आहे.

निलेश राणे यांनी आपल्याला सांगितंल आहे की किरीट सोमय्याचा हत्या असं कटकारस्थान दापोली पोलीस स्टेशन एसपी आणि शिवसेना यांचं झालं आहे, असं किरीट सोमय्यांनी म्हटलं आहे.

राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या कार्यकर्त्यांकडून तुमच्या जीवाला धोका आहे, असे पोलीस अधीक्षकांनी मला सांगितले. मग पोलीस त्यांच्यावर कारवाई का करत नाही, असा सवाल किरीट सोमय्या यांनी केला आहे.

मुंबईवरुन 200 गाड्यांच्या ताफ्यासह आम्ही आलो. पोलिसांनी चार जणांना आत येण्यासाठी सांगितले. पोलीस अधिक्षकांनी आमच्या कार्यकर्त्यांच्या गाड्या अर्धा किलोमीटर लांब पर्यंत अडवल्या आहेत आणि आता आम्हाला दोघांना जिथे जायचे आहे तिथे जा असं सांगत आहेत.

दरम्यान, भाजप नेते किरीट सोमय्या हे महाविकास आघाडीतील मंत्र्याविरोधात चांगलेच आक्रमक झाल्याचे दिसत आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

  “आता बाॅलिवूड, टाॅलिवूड म्हणण्याऐवजी ‘इंडियन फिल्म इंडस्ट्री’ म्हणावं” 

  Corona Update: आज राज्यात ‘इतक्या’ नव्या रुग्णांची नोंद

  अध्यात्माच्या मार्गावर चालण्यासाठी ‘या’ प्रसिद्ध अभिनेत्रीनं चित्रपटसृष्टीला ठोकला रामराम

  “ठाकरे साहेब, तुम्हाला जेलमध्ये टाकायला तुमची परवानगी घेणार नाही”

  ‘हिंमत असेल तर…’; अनिल परबांचं थेट आव्हान