मुंबई | मुंबई क्रुझ प्रकरणात आर्यन खानला अटक करण्यात आलं होतं. त्यानंतर देशभरात एकच खळबळ उडाली. अभिनेता शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान याला एनसीबीनं अटक केली होती. मुंबई क्रुझवर टाकलेल्या छाप्यात त्याला ताब्यात घेण्यात आलं होतं. त्यानंतर त्याची चौकशी करण्यात आली. चौकशीदरम्यान झालेल्या खुलास्यांमुळे त्याला अटक करण्यात आलं होतं.
मुंबई क्रुझ प्रकणात शाहरुख खानचा मुलगा आर्यन खान 26 दिवसांपासून अटकेत होता. त्यानंतर 28 तारखेला आर्यन खानचा जामीन अर्ज मंजूर झाला. मात्र 27 दिवसांनंतर आर्यन खान तुरुंगाच्या बाहेर आला आहे.
आर्यन खानला अटक झाल्यानंतर किरण गोसावी याचा आर्यनसोबतचा सेल्फी व्हायरल झाला होता. आता यावरुन याप्रकरणातील साक्षीदार विजय पगारे यानं मोठा खुलासा केला आहे.
शनिवारी माध्यमांशी बोलताना पगारेनी याविषयी माहिती दिली. मुंबई क्रुझ ड्रग्ज प्रकरणात डील झालं होतं. हे डील किरण गोस्वामी यानं आर्यन खानसोबत काढलेल्या सेल्फीमुळे बारगळलं, असा खळबळजनक दावा पगारे यानं केला.
‘तुझ्या सेल्फीमुळे डील फेल झाली. एवढी काय मस्ती आली होती तुला सेल्फी काढायला. तुझ्यामुळे 18 कोटी गेले. माझी काय अवस्था झालीय तुला माहीत आहे का? मी भीकारी झालोय. इथे समोर देणेकरी बसलेत. त्यांना पैसे द्यायचे आहेत. मी म्हणतो काय तुला इतकी चरबी होती’, असं सुनील पाटीलने किरण गोसावीला फोनवर झापल्याचं पगारेनी सांगतिलं.
विजय पगारेच्या खुलास्यांमुळे आता पुन्हा एकदा या प्रकणाला नवीन वळण आलं आहे. त्यामुळे आता याप्रकरणी पुढे काय होणार याकडे सगळ्यांचं लक्ष लागून आहे.
सध्या आर्यन खानच्या आर्यनच्या जामीनानंतर शाहरुख खान आणि त्याच्या कुटुंबाला मोठा दिलासा मिळाला आहे. ड्रग्ज प्रकरणात आर्यनसह आणखी सात जणांना अटक करण्यात आली होती. त्यापैकी दोन जणांनाही जामीन मंजूर झाला आहे.
आर्यन खान ड्रग्ज प्रकरणात आता एनसीबीचे झोनल डायरेक्टर समीर वानखेडे सापडले आहेत. आर्यनच्या प्रकरणानंतर आता अनेकांनी समीर वानखेडेंवर आरोपांची मालिका लावली आहे. अशातच राष्ट्रवादी नेते आणि राज्याचे अल्पसंख्यांक मंत्री नवाब मलिक यांनी तर ट्विटरवर वानखेडेंवर आरोपांची झोडच लावलीय. त्यामुळे हे प्रकरण आणखी चिघळत चाललं आहे.
महत्त्वाच्या बातम्या –
भाजप नेत्याचा खळबळजनक गौप्यस्फोट, ड्रग्ज प्रकरणात ट्विस्ट?
…अन् क्षणात होत्याचं नव्हतं झालं; काळजाचा थरकाप उडवणारी घटना सीसीटीव्हीत कैद, पाहा व्हिडीओ
‘हा देश कोरोना संसर्गाचं केंद्र ठरेल’; WHO ने दिला गंभीर इशारा
राकेश झुनझुनवाला यांनी मुहूर्त ट्रेडिंगमध्ये तासाभरात कमावले ‘इतके’ कोटी!
“हे सरकार कोणत्याही क्षणी जाईल, त्यांना कळणारही नाही”