“माझ्या ओळखीच्या अनेक महिलांसोबत माझा नवरा शारीरिक संबंध ठेवायचा…”

नवी दिल्ली | मागील काही दिवसांपासून लाॅक अप हा रिअॅलिटी शो वेगवेगळ्या कारणामुळे चर्चेत असतो. अनेक कंटेस्टंट या शोमध्ये खुलासे करत असतात. मंदाना करीमी ही देखील या शोमुळे सध्या चर्चेत आहे.

मंदाना करीमी तिच्या विचित्र वागणुकीमुळे चर्चेत होती. त्यानंतर तिने चिडून हा शो सोडला देखील होता. त्यानंतर तिला या शोमध्ये वाइल्ड कार्ड एंट्री मिळाली आहे. त्यानंतर तिने शोमध्ये मोठा गौप्यस्फोट केला आहे.

मंदाना करीमी हिने तिच्या खासगी आयुष्याविषयी भाष्य केलं आहे.त्याचबरोबर तिने तिच्या पुर्वाश्रमीच्या पतीबद्दल खुलासा केला आहे. वयाच्या 27व्या वर्षी विवाह केला होता, असं मंदाना म्हणाली.

मी आणि गौरव गुप्ता अडीच वर्ष एकमेकांना डेट करत होतो. त्यानंतर आम्ही लग्न करण्याचा निर्णय घेतला. आमचा साखरपुडा झाला. त्यानंतर माझी सासू म्हणजेच गौरवची आई चांगली वागणूक देत होती.

साखरपुड्यानंतर 7-8 महिन्यांनी आम्ही लग्न केलं. आम्ही कोर्ट मॅरेज केलं होतं. गौरवची आई मला फुलं पाठवायची. कॉफी, स्पा आणि माझ्यासोबत शॉपिंगला येयची, त्यामुळे मला ती खुल्या मनाची वाटत होती.

मात्र, काही दिवसांनंतर तिचा स्वभाव बदलला. तर माझ्या नवऱ्याचा देखील स्वभाव बदलू लागला. मी आणि माझा पती 8 महिने एकमेकांसोबत राहिलो. पण नंतर आमच्यातले संबंध बिघडू लागले, असंही ती म्हणाली आहे.

माझा नवरा जसा असल्याचं दाखवत होता, तसा तो नव्हता, असं मंदाना म्हणाली. माझ्या ओळखीच्या अनेक महिलांसोबत त्याचे शारीरिक संबंध होते, असा धक्कादायक खुलासा देखील मंदानाने केला आहे.

दरम्यान, रिअॅलीटी शोमध्ये थेट खुलासा केल्याने आता मंदाना पुन्हा चर्चेत आली आहे.

महत्त्वाच्या बातम्या – 

Petrol-Diesel च्या वाढत्या किंमतीवर केंद्र सरकारचा संसदेत दावा, म्हणाले…

OnePlus चाहत्यांसाठी खुशखबर; पहिल्याच दिवशी मिळवा ‘इतक्या’ हजारांचा बंपर डिस्काऊंट

 Sanjay Raut: “आम्ही तुम्हाला फाट्यावर मारतो”; संजय राऊत कडाडले

 ईडीच्या कारवाईनंतर संजय राऊतांची पहिली प्रतिक्रिया, म्हणाले…

  “पैसे जपून खर्च करा, चिकन खरेदी करायला गेलात तरी भाजप ईडीला कळवेल”