“संजय राऊतांनी केलेली माझी चेष्टा अंगावर येणार आहे, आता खूप काहीतरी…”

मुंबई | गेल्या काही दिवसांपासून राज्यातील राजकारण चांगलचं तापलेलं आहे. सत्ताधारी आणि विरोधकांमध्ये आरोप प्रत्यारोपांच्या फैरी झडत आहेत. त्यातच आता भाजप प्रदेशाध्यक्ष चंद्रकांत पाटील यांनी शिवसेना नेते संजय राऊत यांना इशारा दिला आहे. संजय राऊतांनी माझी केलेली सगळी चेष्टा आता अंगावर येणार आहे, असं चंद्रकांत पाटील यांनी म्हटलं आहे.

बीएमसीतील महापालिकेचे स्थायी समितीचे अध्यक्ष यशवंत जाधव यांची गेल्या काही दिवसांपासून आयकर विभागाकडून चौकशी करण्यात येत आहे. यावेळी यशवंत जाधव यांच्या डायरीत काही नोंदी असल्याचं तपास अधिकाऱ्यांना आढळलं आहे.

यशवंत जाधव यांनी मातोश्रीला 50 लाखांचे घड्याळ दिले असल्याचं लिहिल आहे. तसेच 2 कोटी रूपयांचे गिफ्ट देण्यात आल्याचंही त्यांनी लिहिलं आहे. सलग दोन व्यवहार झाल्याने अधिकारी पुढील तपास करत आहेत.

डायरीतील मातोश्री म्हणजेच आई असा दावा यशवंत जाधव यांनी केला आहे. मात्र, यशवंत जाधव यांनी केलेल्या दाव्यावरून विरोधकांकडून टीका करण्यात येत आहे.

अशी डायरी सापडली की, नाही यासंदर्भात मला काही माहिती नाही. मात्र, मला एवढं माहिती आहे की, खुप काहीतरी  होणार आहे. वारंवार संजय राऊत यांच्याकडून माझी जी चेष्टा केली जाते. ही सगळी चेष्टा अंगावर येणार आहे, असं चंद्रकांत पाटलांनी म्हटलं आहे.

मी जे बोलत आहे ते सगळं खरं ठरत चाललं आहे, असंही चंद्रकांत पाटील म्हणाले आहेत. महाविकास आघाडीच्या नेत्यांनी बॅगा भरून ठेवल्या आहेत. कोणाचा नंबर लागेल याची माहिती नाही. किरीट सोमय्या त्यांचा कर्दनकाळ ठरत आहेत, असा टोलाही चंद्रकांत पाटलांनी लगावला आहे.

यशवंत जाधव प्रकरणावरून विरोधी पक्षनेते देवेंद्र फडणवीस यांनी देखील प्रतिक्रिया दिली आहे.  विधानसभेत बोलताना कोरोनाच्या नावावर भ्रष्टाचार करण्यात आला, असा आरोप केला होता. मुंबईकरांना लुटण्याचं काम करण्यात आलं तो आरोप सिद्ध होत आहे, असं देवेंद्र फडणवसांनी म्हटलं आहे.

दरम्यान, जाधव  यांच्या डायरीत कोणती नोंद आहे हे मी पाहिलं नाही. इनकम टॅक्स यासंदर्भात चौकशी करेल. मात्र, मुंबईकरांची 100 टक्के लुबाडणूक झाली आहे. मुंबईकरांना लुटण्याचं काम त्यांनी केलं आहे, असा आरोप देवेंद्र फडणवीसांनी केला आहे.

महत्त्वाच्या बातम्या- 

  “राष्ट्रवादी नवऱ्याच्या भूूमिकेत तर शिवसेना ही मूक बायकोच्या भूमिकेत” 

  “काही नेते जात्यात, काही नेते सुपात, तर काहींचं पीठ झालंय” 

“तिजोरीच्या चाव्या माझ्याकडेत, नाहीतर ते काय देणार घंटा” 

‘धोनीमुळे मी…’; विजयानंतर श्रेयस अय्यरचा मोठा खुलासा 

“मेहबुबा मुफ्ती भाजपच्या मैत्रीण होत्या, मुफ्तींना भाजपनेच बळ दिलं”