पुणे | सामाजिक कार्यकर्त्या आणि ‘अनाथांची माय’ अशी ओळख असलेल्या सिंधुताई सपकाळ यांचं निधन झालं आहे. ह्रदयविकाराच्या झटक्यानं त्यांचं निधन झाल्याची माहिती मिळाली आहे.
वयाच्या 73 व्या वर्षी त्यांचं निधन झालं. आज रात्री 8 वाजून 10 मिनिटांनी निधन झाले आहे. सिंधुताई सपकाळ यांना नुकतंच पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
महिनाभरापूर्वी सिंधुताई सपकाळ यांचं हर्नियाचे ऑपरेशन झालं होतं. त्यानंतर आता पुण्यातील गॅलक्झी हॉस्पिटलमध्ये निधन झालं आहे. त्यांच्या जाण्यानं आता अनाथांची लेकरं पुन्हा पोरकी झाली आहेत.
सिंधुताईंच्या आयुष्याची कहाणी संघर्षमय आणि प्रेरक आहे. अखेरच्या क्षणापर्यंत त्यांनी अनाथ लेकरांसाठी लढा दिला. हजारो अनाथ लेकरांना त्यांनी आपलं केलं.
आपल्या या संघर्षमय काळात त्यांना समजले की देशात अशी अनेक अनाथ मुले आहेत ज्यांना आईची गरज आहे. तेव्हापासून त्यांनी अनाथ मुलांचा सांभाळ करण्याचा निर्णय घेतला होता.
2012 साली डॉ. बाबासाहेब आंबेडकर समाज भूषण पुरस्कार मिळाला होता तर 2021 साली त्यांना पद्मश्री पुरस्काराने सन्मानित करण्यात आलं होतं.
गेल्या काही दिवसांपासून त्यांची तब्येत खालावली होती. आपल्या उतरत्या वयात देखील त्यांनी अनाथ मुलांसाठी आर्थिक उभारणीसाठी जागोजागी व्याख्यानमाला घेत होत्या.
महत्वाच्या बातम्या –
मुंबई लाॅकडाऊनच्या दिशेने! आजची धडकी भरवणारी कोरोना आकडेवारी समोर
पुण्यात उद्यापासून नवे निर्बंध! अजित पवार म्हणतात, “नियम पाळा नाहीतर…”
…अन् जितेंद्र आव्हाड भाजप आमदाराला म्हणाले, “साॅरी, साॅरी, साॅरी, साॅरी”
पुन्हा शिवसेना-भाजप एकत्र येणार?; शिवसेनेच्या ‘या’ बड्या नेत्याचं मोठं वक्तव्य
जितेंद्र आव्हाडांच्या वक्तव्यावर अजित पवार संतापले, म्हणाले…