माझा फोन लागला नाही असं कधीच होत नाही- शिवाजी आढळराव पाटील

मुंबई | युवासेनेचे शिरुर तालुका प्रमुख संजय पवार यांना शेतीच्या कामासाठी डिझेल लागत होतं. मात्र लॉकडाऊनमुळे पेट्रोलपंप बंद असल्यामुळे त्यांना डिझेलचा अव्वाच्या सव्वा दर त्यांना लावण्यात आला. त्यांनी शिवसेना नेते आढळराव पाटील यांना फोन लावला. मात्र त्यांनी फोन उचलला नसल्याने त्यांनी अजित दादांना फोन लावून आपलं काम केलं. यावर माझा फोन लागला नाही असं कधीच होत नाही, असं शिवाजी आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

माफ करा, पण माझा फोन लागला नाही असं कधीच होत नाही. काहीतरी चुकतयं. संजयला जर खरंच मला फोन लावायचा असता तर तो लागला असता. मुळात माझा फोन सर्वांना नेहमी लागत असतो, असं आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

शेतीची कामे सुरु असताना पेट्रोल पंप चालक डिझेल देत नाहीत, अशी तक्रार करणारा फोन संजय पवार यांनी अजित पवारांना केला. त्यावर लगेचच ‘कोण देत नाही डिझेल? दे बरं फोन त्याला’ अशी आवाजातील जरब अजितदादांनी दाखवली आणि पेट्रोलपंप चालकांनी गपगुमान डिझेल दिलं.

दरम्यान, दादाचा फोन लागला नाही हे मी पहिल्यांदा ऐकलं. सर्व शिरूर लोकसभा मतदार संघतील जनतेला माहित आहे की दादांचा फोन कधीच बंद नसताे ही काळ्या दगडावरची रेष आहे, असं आंबेगाव तालुका संघटक देवीदास आढळराव पाटील यांनी म्हटलं आहे.

महत्वाच्या बातम्या –

-संकटाच्या काळात असंवेदनशीलता दाखवू नका; आरोग्यमंत्र्यांचं खासगी डॉक्टरांना आवाहन

-कोरोनाच्या लढाईसाठी क्रिकेटच्या देवानेही केली 50 लाख रूपयांची मदत

-अजित पवारांचं सैन्य दलाला पत्र; लोकांनो आता तर घराबाहेर पडूच नका…!

-फोन लावायचा होता आढळरावांना लागला अजितदादांना, ‘दादां’नी केलं झटक्यात काम!

-‘कोरोनाचं संकट अत्यंत गंभीर आहे, अर्थव्यवस्थेवर याचा दीडवर्ष परिणाम होणार”